Travel : 'इथे' निसर्गाशी करा गुजगोष्टी! महाराष्ट्रातील 'या' अनोख्या धबधब्याचे दृश्य मन मोहून टाकेल, यात शंका नाही
Travel : तुम्हाला महाराष्ट्रातील एक अनोखा धबधबा पाहायचा असेल तर तुम्ही इथे जाण्याचा विचार करू शकता.
Travel : कडक ऊन, वाढत्या तापमानामुळे कंटाळलात ना? कामाचा ताण, शहरातील गजबजाट, ट्राफिकपासून थोडा काळ का होईना दिलासा हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे..थोड्याच दिवसात उन्हाचे चटके देणारे दिवस संपुष्टात येणार असून मातीचा सुगंध, थंड गारवा, पावसाच्या थेंबांचा आवाज कानी पडणार आहे. तर हिरवागार निसर्ग फुलणार आहे. तुम्हालाही या पावसाळ्यात तुमच्या जीवनातील क्षण फुलवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचे टेन्शन विसरून जाल..
निसर्गाचा सुंदर नजारा पाहायचाय?
महाराष्ट्रातील एक सुंदर धबधबा, त्याची उंची पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. निसर्गाचा सुंदर नजारा पाहायचा असेल तर ठोसेघर धबधब्याला भेट द्या. त्याची उंची सुमारे 1150 फूट आहे. हा धबधबा भारतातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला या धबधब्याचे सौंदर्य आणि त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. वसंत ऋतूमध्ये या धबधब्याजवळ छोटी फुलेही बहरतात.
ठोसेघर धबधबा कोठे आहे?
हा धबधबा महाराष्ट्रातील सातारा शहरापासून 20 किमी अंतरावर महाराष्ट्रात कोकण विभागाच्या काठावर आहे. हा धबधबा ठोसेघर या छोट्या गावात आहे, जिथे तुम्ही निसर्गाचे सुंदर दृश्य पाहू शकता. या तलावाला कास पठार आणि कास तलाव असेही म्हणतात.
कसे पोहोचायचे?
हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यापासून 26 किमी अंतरावर आहे.
तुम्ही पाचगणीहून येत असाल तर त्याचे अंतर 73 किमी आहे.
महाबळेश्वरपासून या धबधब्याचे अंतर 77 किमी आहे.
जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी 141 किमीचा प्रवास करावा लागेल.
मुंबईपासून ठोसेघर धबधब्याचे अंतर 294 किमी आहे.
ठोसेघर धबधबा शांतता, शांत वातावरण आणि प्रसन्न नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
वेळ: तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत भेट देऊ शकता.
तुम्ही बस आणि कॅबने येथे पोहोचू शकता.
ठोसेघर धबधब्याजवळ पार्किंग आणि प्रवेश शुल्क
धबधब्याजवळ पार्किंगची जागा आहे. येथे तुम्हाला 4 चाकी वाहनासाठी 30 रुपये मोजावे लागतील. दुचाकी असलेल्या लोकांसाठी पार्किंग विनामूल्य आहे. धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला 50 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागेल. गेटमधून आत प्रवेश करताच धबधब्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा नकाशा दिसेल. प्रवेशाच्या वेळी तुम्हाला बरेच फेरीवाले आणि रेस्टॉरंट दिसेल.
हेही वाचा>>>
Travel : पृथ्वीवरील स्वर्ग 'काश्मीर' ला उगाच नाही म्हणत..! भारतीय रेल्वेकडून जूनमध्ये फिरण्याची उत्तम संधी, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )