Travel : सप्टेंबरमध्ये करा बॅग पॅक! शिर्डी..अहमदाबाद..हरिद्वार.. सुरू होतायत भारतीय रेल्वेचे 'हे' 3 टूर पॅकेज, जाणून घ्या सविस्तर
Travel : सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 3 टूर पॅकेजसह कुटुंबियांसाह पिकनिक प्लॅन करा, IRCTC द्वारे प्रवास करण्यासाठी किती खर्च येईल? जाणून घ्या
Travel : सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी-जास्त आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान निसर्गसौंदर्य चांगलेच बहरलेले असते. आणि अशा हिरव्यागार वातावरणात फिरायला आवडणार नाही, असा क्वचितच कोणी असेल. म्हणूनच भारतीय रेल्वेने (Indian Railway) खास आपल्या प्रवाशांसाठी एक, दोन नाही, तर तीन टूर पॅकेज आणलेत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही सप्टेंबर महिन्यात टेन्शन फ्री फिरू शकता...
बजेटमध्ये प्रवास करणे सोपे
टूर पॅकेजमधून प्रवास करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकूण खर्च आधीच माहित असतो. यामुळे बजेटमध्ये प्रवास करणे सोपे होते. याशिवाय, टूर पॅकेजमध्ये मार्गदर्शकांची सुविधा देखील दिली जाते, जे प्रवासादरम्यान माहिती देतात आणि ठिकाणांबद्दल स्पष्ट करतात. लोकांना टूर पॅकेजने प्रवास करायला आवडते, कारण यामुळे त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय प्रवासाचा आनंद घेण्याची संधी मिळते. टूर पॅकेजमध्ये सुरक्षेचीही काळजी घेतली जाते. प्रवासादरम्यान कोणतीही समस्या उद्भवल्यास टूर ऑपरेटर ती सोडवण्यास मदत करतो. त्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदाच एकटे प्रवास करणार असाल तरी तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेची काळजी करण्याची गरज नाही.
चेन्नई ते शिर्डी टूर पॅकेज
हे पॅकेज 4 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
हे 3 दिवस आणि 4 दिवसांचे टूर पॅकेज असेल.
या पॅकेजमध्ये ट्रेन आणि कॅबमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 3630 रुपये आहे.
एकट्याने प्रवास केल्यास 5500 रुपये मोजावे लागतील.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा रेल्वे स्टेशनवरून पॅकेज तिकीट बुक करू शकता.
मुंबई ते अहमदाबाद टूर पॅकेज
हे पॅकेज 4 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
हे 4 रात्री आणि 5 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेजमध्ये तुम्ही ट्रेन आणि कॅबने प्रवास करू शकाल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25235 आहे.
एकट्याने प्रवास केल्यास 45810 रुपये मोजावे लागतील.
पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधांबद्दल तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून वाचू शकता.
बरेली, गोरखपूर, हरदोई आणि लखनौ येथून डेहराडून-हरिद्वार टूर पॅकेज
हे टूर पॅकेज 6 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला डेहराडून, हरिद्वार, मसुरी आणि ऋषिकेशला जाण्याची संधी मिळेल.
पॅकेजमध्ये तुम्ही ट्रेन आणि कॅबने प्रवास करू शकाल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 22615 रुपये आहे.
तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 38975 रुपये मोजावे लागतील
हेही वाचा>>>
Women Safety Travel : महिलांसाठी 'ही' हिल स्टेशन्स मानली जातात सुरक्षित, Solo Trip साठी बेस्ट .
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )