Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळलात? जाणून घ्या चटकदार उपवासाच्या मिसळीची रेसिपी
Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या चटकदार उपवासाची मिसळ बनवण्याची रेसिपी.
![Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळलात? जाणून घ्या चटकदार उपवासाच्या मिसळीची रेसिपी Tired of eating khichdi Know the recipe for a delicious fasting Navratri special Upvasachi Misal Recipe Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळलात? जाणून घ्या चटकदार उपवासाच्या मिसळीची रेसिपी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/14/07e06a64e3768e6c4f368d6c8ae1b9ad1663155600560254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Upvasachi Misal Recipe : गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. दोन वर्षानंतर देशभरात ठिक-ठिकाणी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव (Navratri 2022) साजरा होणार आहे. 'नवरात्रोत्सव' म्हटलं की डोळ्यासमोर येतं दांडिया, गरबा आणि उपवासाचे पदार्थ. अनेक मंडळी नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करत असतात. पण खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या चटकदार उपवासाच्या मिसळीची (Upvasachi Misal) रेसिपी...
'उपवासाची मिसळ' बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
- शेंगदाणे - 1 वाटी उकडलेले; अर्धी वाटी भाजलेले
- साबुदाणा - 2 वाट्या (भिजवलेले)
- मिरच्या - 3 ते 4
- जीरे - 1 चमचा
- दही - 1 वाटी
- बटाटा भाजी - 2 वाट्या
- फराळी चिवडा - 1 वाटी
- मीठ - चवीनुसार
- तूप - 1 चमचा
- काकडी, डाळींब - आवडीनुसार
'उपवासाची मिसळ' बनवण्याची कृती
- 'उपवासाची मिसळ' बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाण्याची खिडची करुन घ्यावी.
- शेंगदाणे, मिरची, मीठ वाटून त्याची आमची बनवून घ्यावी. आमटीला तूप आणि आमसूलाची फोडणी घालावी.
- एका मोठ्या भांड्यात खिचडी. बटाटा भाजी आणि शेंगदाण्याची आमटी एकत्र करावी.
- त्यावर गोडसर दही, फराळी चिवडा आणि भाजलेले शेंगदाणे घालावे.
- त्यावर बारीक चिरलेली काकडी घालावी.
- ही गरमागरम चविष्ट मिसळ खायला अतिशय उत्तम चागते.
उपवासाच्या मिसळसोबत प्या गरमागरम दूध
उपवास करताना अनेकांना थकवा जाणवत असतो. अशावेळी दूधाचे सेवन करावे. दूधात प्रोटिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 असते. त्यामुळे उपवासादरम्यान दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उपवासाच्या मिसळसोबत गरमागरम दूध प्यायल्यानंतर पोट भरण्यासदेखील मदत होईल. दुधामुळे अनेक समस्यादेखील जाणवत नाहीत.
संबंधित बातम्या
Navratri Recipe : उपवासाची खिचडी खाऊन कंटाळा आलाय? मग, नवरात्रीत ट्राय करा साबुदाण्यापासून तयार केलेले 'हे' 5 पदार्थ
Navratri Recipe : नवरात्रीला नऊ दिवस उपवास करता? आरोग्याची घ्या अशी काळजी, जाणवणार नाही अशक्तपणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)