Navratri Recipe : उपवासाची खिचडी खाऊन कंटाळा आलाय? मग, नवरात्रीत ट्राय करा साबुदाण्यापासून तयार केलेले 'हे' 5 पदार्थ
उपवास करताना खिचडी, वरईचा भात हे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर साबुदाण्यापासून तयार करण्यात आलेले हे टेस्टी पदार्थ तुम्ही ट्राय करु शकता.
Navratri Recipe : नवरात्रीची (Navratri 2022) सुरुवात अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते. या उत्सवात देवीची पूजा केली जाते. दांडिया, गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सव देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. काही लोक नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास करतात. उपवास करताना खिचडी, वरईचा भात हे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर साबुदाण्यापासून तयार करण्यात आलेले हे टेस्टी पदार्थ तुम्ही ट्राय करु शकता.
साबुदाण्याची खीर
उपवास करताना तिखट पदार्थ खाल्यानं अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शाबुदाण्यापासून तयार करण्यात आलेली खीर तुम्ही खाऊ शकता. साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी साबुदाणा, दूध, साखर, केसर इत्यादी साहित्य लागते. अगदी सोप्या पद्धतीनं तयार करण्यात येणारा हा पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता. खीर तयार झाल्यावर तुम्ही त्यावर ड्राय फ्रुट्स आणि इलायची पाउडर तुम्ही टाकू शकता.
साबुदाणा टिक्का
भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये हिरवी मिर्ची, लाल तिखट, शेंगदाण्याचे कूट इत्यादी मिक्स करुन टिक्की तयार करा ही टिक्की तव्यावर शॅलो फ्राय करा. दह्यासोबत तुम्ही ही टेस्टी टिक्की खाऊ शकता.
साबुदाणा वडा
साबुदाणा वडा ही अनेकांचा आवडता पदार्थ आहे. यामध्ये भिजवलेल्या साबुदाण्यात भाजलेले शेंगदाणे, तिखट हे सगळं मिक्स करुन याचे छोटे वडे तयार करुन ते गरम तेलात तळले जातात. साबुदाणा वडा हा तुम्ही दह्यासोबत किंवा ताकासोबत खाऊ शकता.
साबुदाण्याचं थालिपीठ
ज्याप्रमाणे आपण साबुदाणा वड्यासाठी मिश्रण तयार करतो त्याच प्रमाणे साबुदाणा थालिपीठसाठी मिश्रण तयार करा. या मिश्रणाचं थालिपीठ तयार करा. हे थालिपीठ तव्यावर भाजून घ्या. साबुदाण्याचं थालिपीठ हे टेस्टी लागते तसेच हे तयार करताना तेलाचा वापर देखील जास्त केला जात नाही त्यामुळे हे थालिपीठ हेल्दी देखील आहे.
साबुदाण्याचा डोसा
प्रथम साबुदाणा धुवा. त्यानंतर साबुदाणा 4 तास भिजत घालावा तर भगर अर्धा तास भिजवून घ्यावी. मिक्सरमध्ये साबुदाणा, भगर, दही आणि थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटावं. या मिश्रणामध्ये मीठ घाला. हे मिश्रण तव्यावर टाकून याचा डोसा तयार करा.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Navratri Recipe : नवरात्रीला नऊ दिवस उपवास करता? आरोग्याची घ्या अशी काळजी, जाणवणार नाही अशक्तपणा