एक्स्प्लोर
मोतीबिंदू का होतो? तो कसा ओळखायचा?
मोतीबिंदूचं प्रमाण वाढत गेलं तर एका जागी दोन वस्तू किंवा ठिपके दिसू लागतात. त्यासोबतच अक्षरं व्यवस्थित वाचता येत नाहीत, रंग फिकट दिसतात आणि नजर कमजोर होते.

मुंबई : डोळ्यातील भिंगावर जेव्हा पांढऱ्या रंगाचं गढूळ आवरण तयार होतं, त्याला मोतीबिंदू म्हणतात. अनेक देशांमध्ये अधंत्व निवारणसाठी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण कार्यक्रमात मोतीबिंदूचा समावेश असतो. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होणे, प्रखर उजेडामध्ये न दिसणे, डोळे लालसर होणे आणि डोळ्यांतून पाणी येणे ही मोतीबिंदूंची प्राथमिक लक्षणं आहेत. मोतीबिंदूचं प्रमाण वाढत गेलं तर एका जागी दोन वस्तू किंवा ठिपके दिसू लागतात. त्यासोबतच अक्षरं व्यवस्थित वाचता येत नाहीत, रंग फिकट दिसतात आणि नजर कमजोर होते. एखाद्या व्यक्तीला अशा समस्या असल्यास त्यांने लगेचच डोळे तपासणी करुन घेत योग्य तो प्रथमोपचार करावा. मोतीबिंदू होऊ नये म्हणून पौष्टीक आहार घेणं, जास्त ताण न घेणं, डोळ्यांचे व्यायाम करणं गरजेचं आहे. मोतीबिंदूंचा त्रास साधारण 60 ते 70 वर्षे वयातील व्यक्तींना जास्त प्रमाण होतो. भारताच्या तुलनेमध्ये इतर देशांमध्ये मोतीबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण कमी आहे. VIDEO | मोतीबिंदू होण्यामागची कारणे आणि लक्षण कोणती? | आरोग्य | घे भरारी | ABP Majha लक्षण वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होणे प्रखर उजेडामध्ये न दिसणे डोळे लालसर होणे डोळ्यांतून पाणी येणे सतत चष्म्याचा नंबर बदलणं अंधूक दिसणं डोळ्याच्या बाहुलीजवळ हिरवट पांढऱ्या रंगाचा डाग दिसणं मोतीबिंदू का होतो? वाढत्या वयासोबतच शरीरातली पोषक तत्वांची कमतरता, चुकीचा आहार, धुम्रपान आणि मद्यपान ही मोतीबिंदू होण्यामागची कारणं आहेत. सतत सूर्यप्रकाशात राहिल्याने सूर्यकिरणांच्या तीव्रतेने देखील मोतीबिंदू होऊ शकतो. जास्त ताण, मधुमेह, डोळ्यांचे इतर विकार यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र























