Sleepiness after lunch : दुपारच्या जेवणानंतर झोप का येते? तुम्हीसुद्धा 'ही' चूक करता का? वाचा सविस्तर
Sleepiness after lunch : बहुतेक लोकांना जेवणानंतर झोपेची समस्या जाणवते.
Sleepiness after lunch : तुमच्या बाबतीत अनेकदा असे घडले असेल की, दुपारच्या जेवणानंतर अचानक आळस येतो. आणि झोप घ्यावीशी वाटते. अनेकदा तुम्ही हा विचार केला असेल की, जेवणानंतर अचानक झोप का येते? झोप येऊ नये यासाठी तुम्ही अनेकदा झोपेला कंट्रोल करण्याचाही प्रयत्न केला असेल. कधी ऑफिसमध्ये चुकून झोप लागली तर आपण थोडे पाणी पितो. असे का होत असेल? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. दुपारच्या जेवणाची वेळ चुकल्यामुळे असे होत असेल असेही तुम्हाला वाटले असेल. तर, जेवणानंतर झोप का येते? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
जेवणानंतर झोप का येते?
दिवसा आळस येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमची रात्री झोप पूर्ण झाली नाही. जर, तुमची रात्रीची झोप पूर्ण झाली नसेल, तर तुम्हाला दिवसभर आळस जाणवेल आणि तुम्हाला सारखी झोप येईल. त्यामुळे अशा परिस्थितीत जेवणानंतर लगेच झोप येते आणि मग तुमचे काम करणे कठीण होते. म्हणूनच रात्री वेळेवर झोपण्याची सवय करून घ्या, जेणेकरून ऑफिसमध्ये झोप येणार नाही.
तुम्हीही 'ही' चूक करत आहात का?
काम करताना झोप येण्याचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या जेवणात जास्त साखरेचे सेवन करत आहात. याशिवाय तुम्ही मधुमेह, थायरॉइडशी संबंधित कोणतेही औषध घेत असाल तर झोप आणि आळस याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. जर तुम्ही जेवणात ताक किंवा दही घेत असाल तरी तुम्हाला झोप येत राहील. शरीरातील झोपेचे नियमन करणाऱ्या सेरोटोनिनची पातळी वाढते आणि वरवर पाहता सेरोटोनिनची पातळी वाढल्याने झोप येणे स्वाभाविक होते. म्हणूनच तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे, यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येणार नाही. तसेच, तुम्ही कामही आनंदाने करू शकाल.
खाण्याच्या 'या' सवयी नक्की पाळा
1. तुमच्या जेवणाची वेळ नियमित करा.
2. तुम्ही दिवसातून किती वेळा जेवता त्यानुसार तुमची वेळ निश्चित करा.
3. जेवताना इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करू नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :