एक्स्प्लोर

डोळ्यांखाली काळी वर्तुळं, बारीक रेषा आल्यात? या सोप्या उपायांनी डोळ्यांखालची त्वचा राहील हायड्रेट

काळी वर्तुळे आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी डोळ्यांखालच्या त्वचेची कशी काळजी घ्यावी?

Skincare Health: डोळ्यांच्या खालची त्वचा हा आपल्या चेहऱ्यावरचा अत्यंत संवेदनशील भाग आहे. आपण एका मिनिटात साधारण १५ वेळा पापण्यांची उघडझाप करतो. त्यामुळे १ मिमीपेक्षाही कमी जाडीच्या डोळ्यांखालची त्वचेची विशेष काळजीची गरज आहे, यात काही आश्चर्य नाही. डोळ्याखालच्या भागाची दररोज विशेष काळजी घेतल्यानं काळी वर्तुळे, डोळ्यांखालचा भाग सूजणे,किंवा डोळ्यांखाली बारीक रेषा कमी होण्यास मदत होते असं तज्ञही सांगतात. 

देशात बहुतांश लोकांचा दिवसाचा स्क्रीनवर घालवलेला वेळ हा साधारण ७.३ तासांचा आहे, असे रेडसीर स्ट्रॅटजी कन्सल्टन्ट्सचा अहवाल सांगतो. त्यामुळे डोळ्यांवर पडणाऱ्या ताणामुळे डोळ्यांखाली वर्तुळं येण, थकवा येणं, डोळ्यांखालची त्वजा लूज पडणे, त्वचेवर बारीक रेषा येणं अशा कितीतरी समस्या दिसतात. सध्या अनेकजण चेहऱ्याला हायड्रेट करण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असल्याचं दिसतं. पण विशेष डोळ्यांखालच्या त्वचेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. या त्वचेला नितळ ठेवायचं असेल तर  त्याला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे.

दैनंदिन हायड्रेशनसाठी अनेकजण वेगवेगळे फेसमास्क, सिरम, वापरताना दिसतात. पण डोळ्यांखालच्या त्वचेला योग्य हायड्रेट करण्यासाठी काही घरगुती उपायही करता येतील. 

पुरेशी झोप घ्यावी

 आपल्या झोपेचा आणि आपल्या त्वचेच्या नितळतेचा फार जवळचा संबंध आहे. जागरण झाल्याने डोळ्यांवर ताण पडतो आणि ओघानेच डोळ्यांखालची त्वचाही काळी पडते. यासाठी पुरशी झोप घेणे हा त्यावरचा आपल्या हातात असलेला उपाय आहे, असे तज्ञ सांगतात. 

भरपूर पाणी प्या 

भरपूर पाणी पिणे हा त्वचेच्या हायड्रेशनचा सर्वात चांगला उपाय आहे. भरपूर पाणी पिल्याने त्वचा तजेलदार होऊन निरोगी राहते. साधारण दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे यामुळे काळ्या वर्तुळांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.

चहा कॉफी वारंवार पिणे टाळा

कामाच्या ताणामुळे अनेकांना दिवसातून खूपवेळा चहा कॉफी प्यावी लागते. पण यामुळे त्वचेवर बारीक पुरळं येणं, त्वचा काळी पडणं अशा समस्या येऊ शकतात.

बटाट्याचा रस 

बटाटा बारीक किसून त्याचा रस काढून तो काळ्या वर्तुळाभोवती लावावा किंवा बटाटाच्या चकत्या डोळ्यांवर 10 मिनिटे ठेव्याव्यात. त्यानंतर चेहरा गार पाण्याने धुवावा. हा उपाय नियमित काही दिवस केल्यास डोळ्याखालचे काळी वर्तुळे कमी होतील.

हेही वाचा:

Ayurvedic Medicinal Plants: आजारावर मात करण्यासाठी उपयुक्त आहेत औषधी वनस्पती!

Women Health : महिलांनो.. वयाच्या 30 नंतर 'हे' कॅल्शियम युक्त पदार्थ खा, हाडांचं दुखणं राहील दूर

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaya Tritiya Shubh Muhurta 2026 : अक्षय्य तृतीयेला सोनं-चांदी खरेदी करण्याचा 'हा' शुभ मुहूर्त अजिबात चुकवू नका; वाचा मुहूर्ताची अचूक वेळ आणि महत्त्व
अक्षय्य तृतीयेला सोनं-चांदी खरेदी करण्याचा 'हा' शुभ मुहूर्त अजिबात चुकवू नका; वाचा मुहूर्ताची अचूक वेळ आणि महत्त्व
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव 
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव 
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
Puja Sawant on Ashok Kharat: प्राजक्ता माळीनंतर अशोक खरात प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया चर्चेत; 'या सगळ्या भोंदूगिरीची .. '
प्राजक्ता माळीनंतर अशोक खरात प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया चर्चेत; 'या सगळ्या भोंदूगिरीची .. '
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Vidhanparishad Election 2026 Shivsena: मोठी बातमी: विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये
विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
Embed widget