Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
Covid19 : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेदरम्यान 90 टक्के रुग्णांची दृष्टी काही प्रमाणात कमी झाली आहे.
Covid19 : जगभरात कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. कोरोनामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम लोकांमध्ये दिसत आहेत. आता असा दावा केला जात आहे की, कोरोना काळात 10 पैकी 9 जणांची दृष्टी काही प्रमाणात गेली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेदरम्यान 90 टक्के रुग्णांची दृष्टी काही प्रमाणात कमी झाली आहे.
मुंबई रेटिना सेंटरचे सीईओ विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी यांनी सांगितले की, ''दुर्दैवाने, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेदरम्यान 90 टक्के रुग्णांची काही प्रमाणात दृष्टी कमी झाली आहे. ही समस्या विशेषतः एएमडीग्रस्त (वयोमानानुसार दृष्टिपटल झिजू लागते) रुग्णांमध्ये दिसून आली आहे. यापैकी बहुतेक रुग्णांनी इंट्राव्हिट्रिअल इंजेक्शन्स घेणे चुकवले, त्यामुळे त्यांना हा त्रास झाला.
बेंगळुरूमधील नारायण नेत्रालय आय इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ विट्रीओ-रेटिना सल्लागार डॉ. चैत्रा जयदेव यांनी सांगितले की, ''कोरोनाच्या भीतीमुळे, गेल्या 3-4 महिन्यांत नियमित नेत्रतपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. यामुळे निदान आणि उपचारांमध्ये उशीर झाला आहे, ज्यामुळे दीर्घकाळ दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
डॉक्टरांनी सांगितले की, रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दृष्टी कमी होण्याचे रोखण्यासाठी लवकर निदान आणि उपचार करणे महत्वाचे आहे. नियमित तपासणी जितक्या जास्त काळ बंद असतील तितके डोळ्यांच्या आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरेल. विट्रेरेटिनल सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. राजा नारायण यांनी सांगितले की, "कोरोनाच्या लाटेत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे असल्याशिवाय, मॅक्युलर डिजेनेरेशन किंवा डायबेटिक मॅक्युलर एडेमाच्या रुग्णांनी तपासणीसाठी उशीर करू नये.''
डॉ. दुदानी यांनी सांगितले की, कोरोना काळात रूग्णांच्या रूग्णालयात येऊन नियमित तपासणी करणाऱ्यांमध्ये घट झाली आहे. विशेषत: वृद्ध लोकांमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे इंजेक्शन न मिळाल्याने किंवा वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने डोळ्यांचे आजार वाढण्याची शक्यता आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
- Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर
- Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha