Republic Day 2025 Travel: प्रजासत्ताक दिनी घरी न बसता मुलांना शिकवा इतिहासाचे धडे! भारतीय रेल्वेचे खास टूर पॅकेज, खर्चासह सर्वकाही जाणून घ्या
Republic Day 2025 Travel: प्रजासत्ताक दिनाला मुलांना ऐतिहासिक स्थळी नेऊन त्यांना हुतात्म्यांचे स्मरण आणि शहीद जवानांच्या संघर्षांची तसेच यशाची माहिती करून द्यावी.
Republic Day 2025 Travel: 26 जानेवारी म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे आणि देशभक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा भारत 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 1950 साली याच दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय सुट्टी असते, मात्र हा दिवस केवळ घरी बसून आराम करण्याचा दिवस मानू नये. या दिवशी पालकांनी वीकेंड समजून घरी आराम केला, तर देशासाठी बलिदान दिलेल्या त्या शहीद जवानांचे महत्त्व मुलांना कधीच कळणार नाही. हा दिवस भारताच्या लोकशाही आणि संविधानाच्या यशाचा उत्सव साजरा करतो. त्यामुळे या दिवशी मुलांना ऐतिहासिक स्थळांवर नेऊन त्यांना त्या संघर्षांची आणि यशाची माहिती करून द्यावी. त्यामुळे त्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कळेल. त्यांना समजेल की हा दिवस भारतासाठी का खास आहे आणि तो दरवर्षी उत्साहाने का साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या IRCTC च्या अशा काही टूर पॅकेजची माहिती देणार आहोत. या टूर पॅकेजमधून मुलांसोबत प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता
जयपूर/पुष्कर/जोधपूर/जैसलमेर/बिकानेर
- प्रजासत्ताक दिनी मुलांना राजस्थानचा इतिहास समजण्यासाठी हे टूर पॅकेज चांगले आहे.
- येथे राजवाडे, किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन राजांच्या लढाया आणि योगदानाची माहिती मिळेल.
- हे पॅकेज 25 जानेवारीला सुरू होईल, त्यामुळे तुम्ही 26 जानेवारीला राजस्थानमध्ये असाल.
- हे पॅकेज लखनऊपासून सुरू होत असून या पॅकेजद्वारे तुम्हाला 7 रात्री आणि 8 दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
- पॅकेज फी- जर तुम्हाला 3AC मध्ये प्रवास करायचा असेल तर 2 लोकांसोबत प्रवास करण्यासाठी पॅकेज फी 33500 रुपये आहे.
- मुलेही तुमच्यासोबत प्रवास करतील, त्यामुळे तुम्हाला 21170 रुपये वेगळे द्यावे लागतील.
- भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
अहमदाबाद/वडोदरा
- गुजरातचा महात्मा गांधींशी खोलवर संबंध आहे,
- इथे मुलांना खूप काही जाणून घेण्याची संधी मिळेल.
- हे पॅकेज 24 जानेवारी रोजी अंधेरी/बोरिवली/मुंबई सेंट्रल मेन/सुरत/वापी येथून सुरू होईल.
- पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी आहे. २६ जानेवारीचा दिवस तुम्ही गुजरातमध्येच घालवाल.
- पॅकेज फी- या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रेनच्या चेअर कारमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल.
- 2 लोकांसह प्रवासासाठी पॅकेज फी 20560 रुपये आहे.
- मुलांसाठी पॅकेज फी 15920 रुपये आहे.
- IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करा.
हैदराबाद/मुंबई
- तुम्ही तुमच्या मुलांना हैदराबाद आणि मुंबईला घेऊन जाण्याची योजना देखील करू शकता. प्रजासत्ताक दिनीही येथील वातावरण चांगले असते.
- हे पॅकेज 23 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/मुंबई/पुणे/सोलापूर येथून सुरू होईल.
- पॅकेज 4 रात्री आणि 5 दिवसांसाठी आहे.
- पॅकेज फी- या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळेल.
- 2 लोकांसह प्रवासासाठी पॅकेज फी 19200 रुपये आहे.
- मुलांसाठी पॅकेज फी 14700 रुपये आहे.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो..पहाटेची 'ही' वेळ अत्यंत जीवघेणी, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक, 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )