Women Health: महिलांनो..पहाटेची 'ही' वेळ अत्यंत जीवघेणी, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक, 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? जाणून घ्या
Women Health: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही संकेत देते, स्त्रियांना कोणत्या वेळी हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. ते जाणून घ्या
Women Health: आजकाल महिला या केवळ चूल-मूल पर्यंत मर्यादित न राहता एकावेळेस अनेक जबाबादाऱ्या पार पाडत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन, करिअर अशा अनेक गोष्टींमुळे महिलांचा दिवस निघून जातो. यासर्वांमध्ये महिला स्वत:च्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करताना दिसतात. ज्यामुळे त्यांना विविध शारिरीक आणि मानसिक आरोग्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी हृदयविकार हा आजार आजकाल गंभीर समस्या बनली आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही संकेत देते, त्याकडे दुर्लक्ष करणे सर्वात गंभीर असते. ही आरोग्य समस्या कोणालाही होऊ शकते. कोणत्या वेळी स्त्रियांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो? याची लक्षणं काय? सर्वकाही जाणून घ्या..
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक कधी?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सकाळी सर्वाधिक असतो. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घटना आपत्कालीन असतात, ज्या कधीही कोणालाही होऊ शकतात. अशा परिस्थिती सकाळी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान अधिक सामान्य असतात. कारण झोपेच्या वेळी हार्मोन्समध्ये चढ-उतार होत राहतात. स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं ही पुरुषांपेक्षा खूपच वेगळी असू शकतात. हार्ट रिसर्च इन्स्टिट्यूट एनझेडच्या साइटवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, न्यूझीलंडमध्ये एक डेटा रेकॉर्ड करण्यात आला होता, ज्यामध्ये दर आठवड्याला 55 पेक्षा जास्त महिलांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यांचा मृत्यू होतो. महिलांमध्ये हृदयविकाराच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका किती? आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, हैदराबादचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशुतोष कुमार म्हणतात की, आपण या पैलूबद्दल बोलले पाहिजे, कारण लोकांचा असा समज आहे की, स्त्रियांना हृदयविकाराचा धोका कमी असतो, परंतु तसे नाही. महिलांनाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते. नेहमी छातीत दुखत असेल, तर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर महिलांना साखर आणि कोलेस्टेरॉल सारख्या आजारांनी ग्रासले असेल, तर त्यांच्या आयुष्यात कधीतरी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं
- छातीत दुखणे, दाब किंवा हात दुखणे, जे मान, जबडा किंवा पाठीवरून पसरू शकते.
- श्वास घेण्यास त्रास होणे.
- मळमळ होणे किंवा उलट्या होणे.
- छातीत जळजळ, अपचन किंवा पोटदुखी.
- अचानक चक्कर येणे.
- अशक्त किंवा अस्वस्थ वाटणे.
- थंड घाम.
- थकवा आणि अशक्तपणा.
टाळण्यासाठी काय करावे?
- सर्व प्रथम, आपली साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासा
- आवश्यक असल्यास ते नियंत्रित करा.
- सकस आहार घ्या.
- व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे.
- दारू आणि सिगारेटपासून दूर राहा.
- थंडीच्या मोसमात अधिक काळजी घेण्याची गरज आहे,
- त्यामुळे जर तुम्ही कोलेस्ट्रॉल, शुगर किंवा बीपीचे रुग्ण असाल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
हेही वाचा>>>
Weight Loss: महिन्याभरात शरीरातील चरबी विरघळेल, वजन होईल कमी, फक्त रात्रीच्या जेवणानंतर या 5 गोष्टी करू नका..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )