Navratri 2023: 9 दिवसच का साजरी करतात शारदीय नवरात्र? नऊ रात्रींचे महत्त्व, इतिहास जाणून घ्या
Shardiya Navratri 2023: नवरात्रीच्या नऊ रात्री खूप खास मानल्या जातात. जाणून घ्या शारदीय नवरात्री 9 दिवस का साजरी केली जाते, त्यात पूजेचे आणि उपवासाचे महत्त्व.
![Navratri 2023: 9 दिवसच का साजरी करतात शारदीय नवरात्र? नऊ रात्रींचे महत्त्व, इतिहास जाणून घ्या Shardiya Navratri 2023 marathi news date muhurat navratri nine nights puja history significance Navratri 2023: 9 दिवसच का साजरी करतात शारदीय नवरात्र? नऊ रात्रींचे महत्त्व, इतिहास जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/c5f00cd36fb27567eea3799c0b39eaa91696818416632381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shardiya Navratri 2023 : शारदीय नवरात्रीचा (Navratri 2023) उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत साजरा केला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस शक्तीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात. या उत्सवामुळे लोकांना आध्यात्मिकरित्या जागृत होण्याची तसेच देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळविण्याची संधी मिळते. 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. घटस्थापना वेळ, महत्त्व आणि नवरात्रीत नऊ दिवस शारदीय नवरात्र का साजरी केली जाते? जाणून घ्या
नवरात्र 9 दिवस का साजरी केली जाते?
शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि शेवटचा दिवस 'विजयादशमी' (दसरा) म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये भगवान रामाने लंकापती रावणाचा पराभव केला. तसेच देवी दुर्गाने महिषासुराचा पराभव केला. एका पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला. तेव्हापासून देवी मातेला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून, माता दुर्गेच्या शक्तीला समर्पित नवरात्री व्रत पाळताना, तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते.
शारदीय नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व
नव म्हणजे नऊ आणि नवीन. शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्ग रुप पालटतो. ऋतू बदलू लागतात. यामुळेच नवरात्रीच्या काळात भाविक संतुलित आणि सात्विक आहार घेतात, तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात. त्यामुळे ऋतुबदलाचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.
शारदीय नवरात्रीमध्ये 'रात्री' पूजेचे महत्त्व
नवरात्रीच्या 9 रात्री खूप खास मानल्या जातात. यात उपवास, उपासना, मंत्रजप, संयम, नियम, यज्ञ, तंत्र, योग याद्वारे व्यक्ती नऊ अलौकिक सिद्धी प्राप्त करू शकता, असे सांगितले जाते. पुराणानुसार रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात. जेव्हा रात्रीची वेळ शांत राहते, तेव्हा देवाशी संपर्क साधण्याचा सराव दिवसाच्या तुलनेत अधिक प्रभावी असतो. दुर्गा देवीची रात्री पूजा करून शरीर, मन आणि आत्मा. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सुख प्राप्त होते.
नवरात्रीच्या 9 शक्ती
नवरात्रीत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, ज्यांना नवदुर्गा म्हणतात - शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री.
शारदीय नवरात्री 2023 घटस्थापना मुहूर्त
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 11.44 ते दुपारी 12.30 पर्यंत आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Navratri 2023 : देवी दुर्गेचे प्रथम शक्तीपीठ पाकिस्तानात? नवरात्रीत होते विशेष पूजा, जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)