Shani Dev : शनिदेव 2024 पर्यंत 'या' राशींना त्रास देतील, चुकूनही 'या' चुका करू नका, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे?
Shani Dev : शनिदेव अशा देवतांपैकी एक आहेत, ज्यांचा राग कोणावर एकदा आला की लवकर शांत होत नाही. तसेच अशा व्यक्तीला दीर्घकाळ शनीची साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो

Shani Dev : शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. या 5 राशींवर 2024 पर्यंत शनीच्या साडेसाती आणि शनीच्या ढैय्याचा प्रभाव राहील. कोणत्या राशी आहेत आणि त्यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? जाणून घ्या
अशा लोकांनाच शनिदेव त्रास देतात
पौराणिक मान्यतेनुसार, सूर्यपुत्र शनिदेवाबद्दल असे म्हटले जाते की त्यांचा क्रोधित स्वभाव आणि ग्रहस्थिती कुणाचाही नाश करू शकते. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही. ज्यांचे कर्म चांगले नाही अशा लोकांनाच शनिदेव त्रास देतात. शनिदेव ही न्यायाची देवता आहे. यामुळेच भगवान शिवाने नऊ ग्रहांपैकी न्यायाधीशाचे काम शनिदेवावर सोपवले आहे
कोणत्या राशी आहेत आणि त्यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? जाणून घ्या
कर्क
कर्क राशीच्या लोकांवर शनीची छाया 2024 च्या शेवटपर्यंत राहील, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही धोकादायक काम करणे टाळावे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या प्रभावाचा प्रकोप वर्ष 2024 अखेरपर्यंत राहील. या काळात वाहन चालवणे टाळावे. वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्या.
मकर
मकर राशीच्या लोकांना 2024 च्या शेवटपर्यंत शनीच्या साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. या काळात कोणाचीही मदत करण्यास नकार देऊ नका. सेवाभावी कार्य करावे.
कुंभ
कुंभ राशीचे लोक देखील सन 2024 मध्ये शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली राहतील. या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि स्तोत्राचे पठण अवश्य करावे, कोणाशीही भांडण किंवा वैर करू नका.
मीन
मीन राशीच्या लोकांवर सन 2024 मध्ये शनीच्या साडेसातीचा प्रभाव दिसेल. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते
शनिदेव अशा देवतांपैकी एक आहेत, ज्यांचा राग कोणावर एकदा आला की लवकर शांत होत नाही. तसेच अशा व्यक्तीला दीर्घकाळ शनीची साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र मानले जातात. शास्त्रात त्यांचा शनि ग्रह म्हणून उल्लेख आहे. एवढेच नाही तर शनिदेवाला न्यायाची देवताही म्हटले जाते. असे मानले जाते की, शनिदेव कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, मग ते वाईट असो किंवा चांगले. शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात. आयुष्यातील दु:ख दूर होतात. कपट, मत्सर आणि द्वेषापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:























