(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sarva Pitri Amavasya 2023 : सर्वपित्री अमावस्येला पितरांना मिळेल मोक्ष, 'हे' खास उपाय करा, शास्त्रात म्हटंलय..
Sarva Pitri Amavasya 2023 : पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकला नसाल, तर त्यासाठीही सर्व पितृ अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो.
Sarva Pitri Amavasya 2023 : पितृपक्षात (Pitru Paksha 2023) सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस आहे. शास्त्रानुसार, ज्यांना पितरांची मृत्यु तारीख माहित नाही अशा सर्व पितरांचे या दिवशी श्राद्ध केले जाते. पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकला नसाल तर त्यासाठीही सर्व पितृ अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो. यावेळी सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबरला आहे. असे मानले जाते की या दिवशी काही विशेष उपाय केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो.
सर्वपित्री अमावस्या कधी सुरू होते?
अमावस्या तिथी : 13 ऑक्टोबर सकाळी 9.51 पासून सुरू होते
अमावस्या तिथी समाप्ती : 14 ऑक्टोबर, शनिवारी रात्री 11:25 वाजता
सर्वपित्री अमावस्येला हे उपाय करा
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पूर्वज संतुष्ट होतात.
पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास मानला जातो. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. संध्याकाळी येथे दिवा लावावा.
या दिवशी पितरांना काळ्या तिळाचे पाणी अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले आणि सुगंध मिश्रित पाणी अर्पण करावे.
या पाण्याने तर्पण केल्याने पितरांची तहान भागते असे मानले जाते.
या दिवशी गायीला हिरवा पालक खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. हा उपाय केल्याने गायीसह सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त
सेच पूर्वज प्रसन्न होऊन धन-समृद्धीचे आशीर्वाद देतात.
जर पितृ पक्षाच्या 15 दिवसांत तुम्ही तर्पण करू शकला नाही, तर सर्वपित्री अमावस्येला तर्पण करून तुम्ही तुमच्या पितरांना प्रसन्न करू शकता.
असे मानले जाते की हे तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
पितृ पक्षात दानाचे खूप महत्त्व आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना दान द्यावे.
या दिवशी चांदीचे दान करणे उत्तम मानले जाते. पूर्वज ह्यावर समाधानी असतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Sarva Pitri Amavasya 2023 : यंदा सर्वपित्री अमावस्येला दुर्मिळ योगायोग, पितरांचा आशीर्वाद कायम राहील, 'हे' उपाय करा