एक्स्प्लोर

Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा पांढरेवाडीला मुक्काम, तर मुक्ताबाईंची पालखी पंचवीस दिवसांनंतर पंढरपुरात पोहोचणार 

Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या जवळ असून मुक्ताबाईंची पालखी पंचवीस दिवसांनंतर आज पंढरपुरात पोहोचणार आहे. 

Sant Nivruttinath Palkhi : 'आनंदाच्या रिंगणात आनंदाचा तरंग | विठूच्या नामाचे गातो आम्ही अभंग ||, ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम..' असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या एक दिवसात पंढरपूरला पोहोचतील. तर अनेक दिंड्या या पंढरपुरात पोहोचल्या असून विठुरायाची नगरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. अशातच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) पंढरपूरच्या जवळ पोहोचली असून कालच्या करकंब येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पांढरीच्या वाडीकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी आष्टीतून मार्गस्थ होत पंढरपूरच्या दिशेने चालू लागली आहे. आज सायंकाळपर्यंत संत मुक्ताबाई विठुरायाच्या चरणी पोहोचतील. 

गेल्या 23 दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यातून दिंड्यांनी पंढरपूरकडे कूच केली आहे. अनेक दिंड्या पंढरपुरात पोहोचल्या आहेत. अनेक दिंड्या पंढरपूरच्या मार्गावर आहेत. त्या आज सायंकाळपर्यंत पंढरपूरला (Pandharpur) पोहोचतील. जवळपास 23 दिवसांहून अधिक दिवसांचा पायी प्रवास करत मजल दर मजल करत दिंड्या पंढरपूरला पोहोचत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा पंचविसावा दिवस आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी करकंब येथे मुक्कामी होती. या मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. 

राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आता काही अंतरावर पंढरपूर असून एक दिवसाच्या मुक्कामानंतर दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचणार आहेत. त्यामुळे दिंडीतला वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेला असून कधी एकदाची भेट होतेय, अशी अवस्था वारकऱ्यांची झाली आहे. संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी आष्टी गावात मुक्कामी होती. त्यानंतर आज सकाळी येथून मार्गस्थ होऊन रोपळे येथे दुपारचे जेवण केले जाणार आहे. त्यानंतर आज संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. 

आज पालख्यांचा मुक्काम कुठे?

संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या जवळ पोहोचली असून अवघ्या काही अंतरावर पंढरपूर आहे. अजून एक दिवसांचा मुक्काम केल्यानंतर नाथांच्या पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. आजचा मुक्काम पंढरपूरजवळील पांढरीची वाडी येथे होणार असून त्यानंतर पंढरपूर शहराकडे मार्गस्थ होणार आहे. काल करकंब येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पायी मार्गाने पांढरीच्या वाडीला मुक्कामाला पोहचणार आहे. संत निवृत्तीनाथांच्या पायी दिंडी पालखीने आतापर्यंत 400 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तर आष्टी गावातील मुक्कामानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी पायी मार्गाने रोपळे, बाभूळगाव, अढीव, विसावामार्गे पंढरपुरात पोहोचणार आहे. आतापर्यंत मुक्ताईनगरपासून पालखीने तब्बल 448 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा

Ashadhi Wari 2023 : विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ येणार; असा असेल संपूर्ण दौरा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget