Ramabai Ambedkar Death Anniversary : बाबासाहेबांच्या जीवन संघर्षातील सहचारिणी, ज्यांच्या त्यागामुळे 'भीम' बनले 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'!
Ramabai Ambedkar Death Anniversary : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, असं अनेकदा म्हटलं जातं आणि रमाबाई आंबेडकरांनी ही म्हण खरी करून दाखवली.
Ramabai Ambedkar Death Anniversary : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' आणि भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक आव्हानांचा सामना केला. पण ते कधीच थांबले नाहीत. त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेकांनी साथ दिली. या सर्व लोकांमध्ये आणखी एक नाव होते, ज्याचा उल्लेख केल्याशिवाय बाबासाहेबांच्या यशाची गाथा अपूर्ण आहे. ते नाव म्हणजे रमाबाई आंबेडकर! प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, असं अनेकदा म्हटलं जातं आणि रमाबाई आंबेडकरांनी ही म्हण खरी करून दाखवली.
बाबासाहेबांच्या संघर्षात रमाबाईंची शेवटच्या श्वासापर्यंत साथ
रमाबाई भीमराव आंबेडकर या बाबासाहेबांच्या पत्नी होत्या. आजही लोक त्यांना 'मातोश्री' रमाबाई म्हणून ओळखतात. 7 फेब्रुवारी 1898 रोजी जन्मलेल्या रमाबाईंच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांचे आई-वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या मामाने रमाबाईंना आणि त्यांच्या भावंडांना वाढवले.
1906 मध्ये, वयाच्या 9 व्या वर्षी, भायखळा मार्केट, मुंबई मध्ये त्यांनी वयाच्या 14 वर्षांच्या भीमरावांशी लग्न केले. रमाबाईंना भीमराव प्रेमाने 'रामू' म्हणत आणि रमाबाई त्यांना 'साहेब' म्हणायच्या. मागासवर्गीयांची उन्नती हे बाबासाहेबांच्या जीवनाचे ध्येय असल्याचे रमाबाईंना लग्नानंतर लगेचच समजले. आणि हे तेव्हाच शक्य झाले जेव्हा बाबासाहेब स्वतः शिक्षणाची मशाल संपूर्ण देशात पेटवण्याइतपत शिक्षित होते.
बाबासाहेबांच्या या संघर्षात रमाबाईंनी त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. बाबासाहेबांनीही रमाबाईंचे आपल्या जीवनातील योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. त्यांचे 'थॉट्स ऑन पाकिस्तान' हे पुस्तक रमाबाईंना अर्पण करताना त्यांनी लिहिले की, एका विनम्र भीमापासून डॉ. आंबेडकर बनवण्याचे श्रेय रमाबाईंना जाते.
प्रत्येक परिस्थितीत रमाबाईंची बाबासाहेबांना साथ लाभली. बाबासाहेब वर्षानुवर्षे शिक्षणासाठी बाहेर राहिले आणि या काळात रमाबाईंनी घर सांभाळले. कधी त्या घरोघरी जाऊन शेणाच्या गोवऱ्या विकायच्या, तर कधी इतरांच्या घरी काम करायच्या. प्रत्येक लहान-मोठं काम करून त्या उदरनिर्वाह करत होत्या आणि त्याच बरोबर शिक्षणाचा खर्च उचलण्यात त्या बाबासाहेबांना मदत करत राहिल्या.
..तरीही रमाबाईंनी धीर सोडला नाही, त्या स्वतः बाबासाहेबांचे मनोबल वाढवत राहिल्या
जीवनसंघर्षात त्यांची आणि बाबासाहेबांच्या पाच मुलांपैकी फक्त यशवंतच वाचले. पण तरीही रमाबाईंनी धीर सोडला नाही, त्या स्वतः बाबासाहेबांचे मनोबल वाढवत राहिल्या. रमाबाईंचे बाबासाहेब आणि देशातील लोकांप्रती असलेले समर्पण पाहून अनेक लेखकांनी त्यांना 'त्यागवंती रमाई' असे नाव दिले.
आज बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे त्यांच्या जीवनावरही नाटके, चित्रपटांसह इतर देशातील अनेक संस्थांनाही रमाबाईंचे नाव देण्यात आले. त्यांच्यावर 'रमाई', 'त्यागवंती रामामौली', 'प्रिया रामू' अशी पुस्तके लिहिली गेली आहेत. बाबासाहेबांना 29 वर्षे साथ दिल्यानंतर 27 मे 1935 रोजी रमाबाईंचे दीर्घ आजाराने निधन झाले.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, असं अनेकदा म्हटलं जातं आणि 'मातोश्री' रमाबाईंनी ही म्हण खरी करून दाखवली.