Mouth Cancer : तुमचा कान सतत दुखतोय? असू शकते तोंडाच्या कर्करोगाचे लक्षणं
कर्करोगचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपचार शक्य आहे. कानांमध्ये मुंग्या येणे किंवा एखादा विचित्र आवाज येणे, हे तोंडाच्या कर्करोगाचे चिन्ह असू शकते.
Mouth Cancer : कर्करोग हा अत्यंत भयानक आजारांपैकी एक समजला जातो. कर्करोगवर अजूनतरी कोणतेही औषध तयार करण्यात आलेले नाही. कर्करोगचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपचार शक्य आहे. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नुसार, सहापैकी एकाचा मृत्यू कर्करोगाने होतो. परंतु जागरूकतेच्या अभावामुळे लोक या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. अशा काही समस्या आहेत ज्यांना आपण किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. पण ही काही लक्षणं तुमच्याकरता कर्करोगचे कारण ठरू शकते. जाणून घेऊयात या काही लक्षणांविषयी सविस्तर.
तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे (Symptoms Of Oral Cancer)
कानांमध्ये मुंग्या येणे किंवा एखादा विचित्र आवाज येणे, हे तोंडाच्या कर्करोगाचे चिन्ह असू शकते. म्हणूनच, कानात अचानक झालेल्या अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नका. कानामध्ये होणाऱ्या वेदना हळूहळू जबडा आणि गालापर्यंत पसरतात. अशावेळी कान सुन्न झाल्यासारखे वाटणे किंवा कानावर दाब जाणवू लागतो. तसेच जर तोंडात बराच काळ पांढरा डाग, जखम, तोंड आलं असेल, तर तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तोंडातून दुर्गंध येणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, काही गिळण्यात त्रास होणे, जास्त लाळ किंवा रक्त येणे, ही देखील तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. यामध्ये जखमा, सूज, रक्तस्त्राव, जळजळ, तोंडात दुखणे अशी लक्षणे दिसतात.
तोंडाच्या कर्करोगाची कारणं (Causes Of Oral Cancer)
तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने ओठ, जीभ, हिरड्या, गालाच्या आतील बाजूस होतो किंवा तोंडात कोठेही जखम, गाठ असेल तर ती त्याची सुरवात समजावी. गुटखा, सिगारेट व अशांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
या लोकांना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो (These People Are At A Higher Risk Of Developing Oral Cancer)
जे लोक तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणात करताता त्या लोकांना तोंडाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. तसेच दारू पिणाऱ्या लोकांना देखील कर्करोग होऊ शकतो. तर ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी देखील तोंडाच्या कर्करोगाची लागण होऊ शकते. तोंडात किंवा कानात वेदना होत असतील तर तात्काळ डाॅक्चरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )