Tips to Heal Burnt Tongue : गरमागरम खाताना जीभ पोळली? मग करा 'हे' घरगुती उपाय
अनेकदा घाईगडबडीत आपण गरमागरम चहा किंवा एखादा गरम पदार्थ खातो आणि जीभेला भाजते, यामुळे जीभेची चव जाते.
Remedies to Heal Burnt Tongue : अनेकदा आपण खूप घाईगडबडीत असतो आणि कोणताही विचार न करता एखादा गरमागरम पदार्थ खातो. त्यात पावसाळा म्हटलं की, वाफाळलेला चहा आणि काॅफी पिण्याची मज्जा काही निराळीच असते. कधीकधी याच मजेमुळे जीभेला भाजते आणि जीभेची चव जाते. एकदा का जीभ भाजली की, इतर अनेक पदार्थ खाताना त्रास होतो. अगदी तिखट, गरम पदार्थ खातानाही त्रास होतो. त्यामुळे जिभेवर जळजळ आणि फोड येतात. अशा परिस्थितीत जर कधी ही समस्या तुम्हाला उद्भवली तर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. जाणून घेऊया कोणते घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
जीभ भाजल्यावर करा हे घरगुती उपाय
1. जीभ भाजल्यावर थंड पाणी प्या. तसेच एक स्वच्छ कापड घ्या त्यात बर्फाचे काही तुकडे ठेवा आणि भाजलेल्या ठिकाणी ते कापड ठेवा. असे केल्यास तुम्हाला थंडावा मिळण्यास मदत होईल.
2. कोरफड ही थंड गुणधर्मासाठी ओळखली जाते. जीभेच्या भाजलेल्या भागात कोरफड लावा. दिवसातून दोन ते तीन वेळा कोरफड लावल्यास तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.
3. नैसर्गिक , अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असणारे मध देखील भाजलेल्या जीभेकरता एक उत्तम उपाय आहे. एक चमचा मध घ्या ते भाजलेल्या ठिकाणी लावा. यासाठी प्रामुख्याने कच्च्या मधाचा वापर करा.
5. जीभ पोळल्यानंतर तुम्ही आईसक्रिम खावा. आईसक्रिमचे छोटे-छोटे बाईट खा.
6. तुम्ही दह्याचे सेवनही करू शकता. एका वाटीत दही घेऊन मग ते खावा. याने तुम्हाला थंडावा मिळण्यास मदत होऊ शकते.
7. गार दूध देखील भाजलेल्या जीभेसाठी फायदेशीर ठरू शकते.
8. कोणत्याही फळाचा थंडगार रस होणाऱ्या जळजळीला आराम देऊ शकते.
9. तुम्ही तुमच्या भाजलेल्या जागेवर पूदीनाची टूथपेस्ट लावू शकता किंवा एकतर थंड केलेला पूदिनाचा चहा पिऊ शकता.
10. जीभ भाजली असेल तर च्युंईंगम खा. च्युंईंगम खाल्याने तोंडात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लाळ तयार होते. यामुळे आपल्याला जळजळ कमी होण्यास मदत होते.
जीभ भाजल्यास या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
- गरम द्रवपदार्थाचे सेवन करू नका कारण ते तुमच्या भाजलेल्या जागेला त्रास देऊ शकते.
- अॅसिडीक पदार्थ आणि लिंबूवर्गीय फळे टाळा.
- मसालेदार पदार्थांपासून दूर राहा.
- तोंडाच्या स्वच्छतेची चांगली काळजी घ्या.
- जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
इतर महत्वाच्या बातम्या
Good Diet For Sleep : खाण्यापिण्याच्या 'या' सवयींमुळे तुमची झोप होऊ शकते खराब, वाचा सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )