एक्स्प्लोर

Obesity Disease: भारत अडकतोय लठ्ठपणाच्या विळख्यात, लॅन्सेटची धडकी भरवणारी आकडेवारी, तरुणांना सर्वाधिक धोका

Health News: भारतात लठ्ठपणा ही नवी समस्या! लठ्ठपणा किशोरवयीन मुलांमध्ये देखील या आजारांचे प्रमाण वाढवतो. विशेषतः लठ्ठ किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीस टाईप 2 हमखास दिसून येत आहे.

मुंबई: एखादा माणूस किंवा लहान मूल जरी थोडं जाडजुड असेल तर त्याला आपल्या इकडे खात्यापित्या घरातला असं म्हटलं जातं, पण कधीही जाडपणा (Obesity) हा एक आजार आहे आणि त्यावर गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटलं जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारी मुळे भारतातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

द लॅन्सेट हे एक वैद्यकीय नियतकालिक आहे. हे जगातील सगळ्यात जुने आणि सर्वाधिक मान्यतेचे वैद्यकीय नियतकालिक समजले जाते. याच द लॅन्सेट मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले, की भारत संभाव्य लठ्ठपणाच्या साथीचा सामना करत आहे, विशेषत: तरुणांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे येणाऱ्या काळात भारत लठ्ठपणा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध आजारांनी ग्रासलेल्या लोकसंख्येचा सर्वात मोठा देश असेल अशी भीती आहे. 

काय सांगते आकडेवारी?

द लॅन्सेटच्या अभ्यासानुसार भारतात 2022 मध्ये 20 वर्षांवरील 44 दशलक्ष महिला आणि 26 दशलक्ष पुरुष लठ्ठ होते. 1990 मध्ये लठ्ठपणाचे हेच प्रमाण 2.4 दशलक्ष महिला आणि 1.1 दशलक्ष पुरुष असे होते.  तसेच 2022 मध्ये, 5 ते 19 वयोगटातील तब्बल 12.5 दशलक्ष मुलांचे, ज्यामध्ये 7.3 दशलक्ष मुले आणि 5.2 दशलक्ष मुलींचे स्थूलपणे जास्त वजन असल्याचे आढळून आले, 1990 मध्ये हीच आकडेवारी केवळ 0.4 दशलक्ष इतकी होती. 

हा एक अतिशय चिंतेचा विषय आहे, याचे कारण म्हणजे भारताला आधीच हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय. त्यात लठ्ठपणा वाढल्याने या आजारांचे प्रणाम देखील वाढत आहे. लठ्ठपणा किशोरवयीन मुलांमध्ये देखील या आजारांचे प्रमाण वाढवतो. विशेषतः लठ्ठ किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीस टाईप 2 हमखास दिसून येत आहे.

या संदर्भात जो अभ्यास केला गेला त्यासाठी 1990 पासून जमवलेली माहिती वापरण्यात आली. तसेच 1990 सालाची आकडेवारी आणि  2022 सालची आकडेवारी यांची तुलना करण्यात आली. त्यातून अनेक धक्कादायक वास्तव समोर आले. अभ्यासात म्हटले आहे की, भारतात लठ्ठपणाचे प्रमाण 1990 मध्ये 1.2% वरून 2022 मध्ये 9.8% पर्यंत वाढले आणि 2022 मध्ये पुरुषांसाठी 0.5% वरून ते 5.4% झाले. मुलींसाठी लठ्ठपणाचे प्रमाण 1990 मधील 0.1% वरून 2022 मध्ये 3.1% पर्यंत आणि 2022 मध्ये मुलांसाठी 0.1% ते 3.9% पर्यंत वाढले आहे.  NCD Risk Factor Collaboration (NCD-RisC) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे जागतिक डेटाचे विश्लेषण करून असा अंदाज लावला आहे की जगातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये 2022 मध्ये लठ्ठपणाचा दर 1990 मधील दराच्या चौपट होता.

किती वजन असल्यास व्यक्ती जाडेपणाच्या श्रेणीत मोडते?

ही समस्या फक्त भारतालाच भेडसावत नाही तर संपूर्ण जगाला भेडसावत आहे. द लॅन्सेटच्या अहवालात प्रकाशित झालेल्या जागतिक अंदाजानुसार, जगभरात एक अब्जाहून अधिक लोक लठ्ठ आहेत. 2022 च्या आकडेवारीनुसार यामध्ये सुमारे 88 कोटी प्रौढ आणि 15.9 कोटी मुलांचा समावेश आहे. सुमारे 190 देशांच्या या यादीत ब्रिटन पुरुषांसाठी 55 व्या आणि महिलांसाठी 87 व्या स्थानावर आहे. अमेरिकन पुरुष या यादीत 10 व्या आणि महिला या यादीत वरुन 36 व्या स्थानावर आहेत. चिनी महिला 179 व्या आणि पुरुष 138 व्या स्थानावर आहेत. तर भारतीय महिला 190 देशांच्या यादीत 171 व्या आणि पुरुष 169 व्या स्थानावर आहेत. पण भारतात हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारतर्फे केलेले प्रयत्न कमी असल्याचे तज्ञ सांगता. 

जागतिक आरोग्य संघटनेने परिभाषित केल्यानुसार, लठ्ठपणा म्हणजे चरबीचा एक असामान्य किंवा जास्त संचय आहे ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय (BMI) म्हणजे उंचीच्या प्रमाणातलं वजन. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार 25 पेक्षा जास्त BMI असेल तर तुम्ही ओव्हरवेट असता म्हणजे तुमचं वजन गरजेपेक्षा जास्त आहे, असं मानलं जातं. पण यावर देखील उपाय आहेत. 

लठ्ठपणाच्या समस्येपासून वाचवण्यासाठी मुलांना कोणता आहार द्याल?

मुलांना संतुलित आहार दिला, ज्यात कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स), प्रथिनं, जीवनसत्व, फळं आणि भाज्यांचा समावेश असेल, तर कुपोषण आणि अतिपोषण हे दोन्ही रोखता येतील. फिट आणि निरोगी राहण्यासाठी दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली करण्याची डॉक्टर शिफारस करतात. मुलांसाठी अस्वास्थ्यकर अन्न आणि शीतपेयांची विक्री, मुलांसाठी लक्ष्यित जंक फूड जाहिरातींवर प्रतिबंध, स्पष्ट पोषण लेबलिंग आणि शाळेच्या कॅफेटेरियामध्ये आरोग्यदायी पर्यायांचा प्रचार करणे आवश्यक आहे.

लठ्ठपणा नक्कीच एक मोठी समस्या आहे. मात्र ती सोडवण्यासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारताने या आधी देखील पोलिओ सारख्या मोठ्या आजारावर मात मिळवली आहे. त्यामुळे भारताला लठ्ठपणावर मात मिळवता येईल. तसे केले तरच भारताचे भविष्य ज्या पिढीवर अवलंबून आहे, त्या पिढीला डायबिटीस, हृदयरोग, ब्लड प्रेशर आणि तश्या आजारांपासून वाचवता येईल. 

आणखी वाचा

200 किलो वजन केलं कमी, जगातील सर्वात लठ्ठ महिलेचा प्रेरणादायी प्रवास

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget