(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आकाशगंगेतील सुपरमॅसिव्ह 'बॅकहोल'चा ऐतिहासिक शोध, 2 शास्त्रज्ञांना नोबेल; अकॅडमीकडून ट्विट करत आठवण शेअर
Nobel Prize : या ऐतिहासिक शोधासाठी आंद्रिया गेझ आणि रेनहार्ड गेन्झेल 2 शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळाला. ज्याची नोबेल अकॅडमीने आठवण करुन दिलीय.
Nobel Prize : शास्त्रज्ञांनी प्रथमच आकाशगंगेच्या (Milky Way) मध्यभागी असलेल्या कृष्णविवराचे (supermassive back hole) छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यावेळी संपूर्ण जगाने आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराचे पहिले धगधगते परंतु अस्पष्ट चित्र पाहिले. आणि महत्वाची बाब म्हणजे या ऐतिहासिक शोधासाठी गेल्या आठवड्यात आंद्रिया गेझ आणि रेनहार्ड गेन्झेल या 2 शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार मिळाला होता, ज्यांनी हा शोध तर्क आणि संशोधनातून लावला, त्यांना तो शोध प्रत्यक्षात पाहता आला, यासाठी नोबेल अकॅडमीने एक ट्वीट करत ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली आहे.
Andrea Ghez and Reinhard Genzel were awarded the Nobel Prize for discovering a supermassive back hole at the centre of the Milky Way. Last week we saw that black hole for the very first time: https://t.co/U29gO9gjLX
— The Nobel Prize (@NobelPrize) May 17, 2022
इंटरनॅशनल कन्सोर्टियमने फोटो प्रसिद्ध केला
हे फोटो इंटरनॅशनल कन्सोर्टियमने जारी केले असून खगोलप्रेमी याची आतुरतेने वाट पाहत होते ते चित्र आता जगासमोर आले. सैजिटेरियस ए हे कृष्णविवर आपल्या सूर्यमालेपासून 27,000 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर आहे. हे चित्र होरायझन टेलिस्कोपने घेतले आहे. अशा 8 सिंक्रोनस रेडिओ दुर्बिणी जगाच्या विविध भागात बसवण्यात आल्या आहेत.
सूर्यापेक्षाही 43 लाख पट जड
सैजिटेरियस ए नावाचे हे कृष्णविवर सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 4.3 दशलक्ष पट मोठे आहे. त्यात एक खोल गडद भाग दिसतो, हा ब्लॅक होल आहे. हा संपूर्ण भाग गुरुत्वाकर्षणाच्या शक्तींद्वारे अति-उष्ण वायूमधून येणाऱ्या प्रकाशाने वेढलेला आहे.
प्रतिमा कृष्णविवराभोवती चमकणाऱ्या वलयासारखी
अॅरिझोना विद्यापीठाचे प्रोफेसर गेन्झेल म्हणाले की, 'ही प्रतिमा कृष्णविवराभोवती चमकणाऱ्या वलयासारखी आहे. या कृष्णविवराला सैजिटेरियस ए म्हणतात. तेथे अतिमॅसिव्ह ब्लॅक होल असल्याचा संशय आहे. हे अनेक दशकांपासून गहन खगोलशास्त्रीय अभ्यासाचे केंद्र आहे. त्याच्याभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांचे निरीक्षण केल्यावर ही गोष्ट समोर आली आहे.
संबंधित बातम्या