NASA : चंद्रावरुन आणलेल्या मातीत लावलं रोप, पुढे 'जे' घडलं ते पाहून नासाचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित!
Plants Grown In Lunar Soil : अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने चंद्रावरून आणलेल्या मातीत चक्क रोपे लावण्याचा पराक्रम केला आहे
![NASA : चंद्रावरुन आणलेल्या मातीत लावलं रोप, पुढे 'जे' घडलं ते पाहून नासाचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित! nasa scientist plants have been grown in lunar soil for the 1st time ever marathi news NASA : चंद्रावरुन आणलेल्या मातीत लावलं रोप, पुढे 'जे' घडलं ते पाहून नासाचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/d6cd73752bb0506c74e67784c144f13d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Plants Grown In Lunar Soil : चंद्रावर जीवनाची शक्यता विज्ञान जगासाठी नेहमीच आश्चर्यकारक विषय राहिला आहे. चंद्रावर जीवसृष्टी शक्य आहे की नाही? यावर सर्वच देशांचे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. दरम्यान, अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने चंद्रावरून आणलेल्या मातीत चक्क रोपे लावण्याचा पराक्रम केला आहे. ही माती अलीकडेच नासाच्या अपोलो अंतराळवीरांनी त्यांच्यासोबत आणली होती. चंद्रावरून आणलेली धूळ आणि मातीत शास्त्रज्ञांनी वनस्पती वाढवल्या आहेत, हा मानव इतिहासातील पहिला उपक्रम असून चंद्रावरील संशोधनातून महत्वाची माहिती समजू शकणार आहे.
नासाच्या अपोलो अंतराळवीरांनी चंद्रावरून आणली माती
फ्लोरिडा विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चरल सायन्सेसचे रॉबर्ट फेरेल म्हणाले, "अपोलो मून रेगोलिथमध्ये म्हणजेच चंद्राच्या मातीत उगवलेली वनस्पती ट्रान्सक्रिप्टोम्स निर्माण करतात, जे चंद्रावर होत असलेल्या सर्व संशोधनांना नवीन सकारात्मक दिशा देत आहेत." यावरून हे सिद्ध होते की चंद्राच्या मातीमध्ये ही रोपे यशस्वीरित्या अंकुरीत होऊ शकतात आणि वाढू शकतात.
...आणि या सर्व बिया अंकुरल्या.
रॉबर्ट फेरेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपोलो 11 च्या नील आर्मस्ट्राँग, बझ आल्ड्रिन आणि इतर मूनवॉकर्सने आणलेल्या चंद्राच्या मातीत अरबीडोप्सिसच्या बिया लावल्या. आणि आश्चर्य म्हणजे त्यात या सर्व बिया अंकुरल्या. चंद्राची माती, ज्याला चंद्र रेगोलिथ देखील म्हणतात, पृथ्वीवर आढळणाऱ्या मातीपेक्षा ही माती भिन्न आहे. अपोलो 11, 12 आणि 17 मोहिमेदरम्यान, चंद्रावरून माती आणण्यात आली होती, ज्यामध्ये रोपे लावण्यात आली होती. ज्यावरून ही शक्यता आता फार दूरची राहिलेली नाही. विशेष म्हणजे अंतराळात अशाप्रकार संशोधन करण्याचा चीनचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. जानेवारी 2019 मध्ये, जेव्हा चीनचे चांगई-4 अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले, तेव्हा त्यांनी सोबत कापूस बियाणे घेतले.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Biggest White Diamond : जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या हिऱ्याची विक्री, किंमत माहित आहे का?
- Viral Video : 'या' चिमुकल्याचा स्वॅग पाहा, झोपाळ्यावर बसण्यासाठी लावली अनोखी शक्कल
- Viral Video : वाघावर भारी पडला कुत्रा, पाहा थक्क करणारा व्हिडीओ
- Trending : जगातला सर्वाधिक महागडा उंट, सौदी अरेबियात झाला इतक्या रक्कमेला लिलाव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)