एक्स्प्लोर

Mosquito : डासांना मारणारं मॉस्किटो रिपेलंड लिक्विड आरोग्यासाठी किती घातक? वापरण्यापूर्वी 'हे' वाचा...

Mosquito Repellent Liquid : डासांपासून सुटका मिळवण्यासाठी काही गोष्टींचा वापर करून आपण स्वतःचे संरक्षण करतो पण, त्यामुळे आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो, याबाबत सविस्तर वाचा.

Mosquito Repellent Effect on Health : डास (Mosquito) चावल्यामुळे अनेक आजारांची लागण होऊन आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. डासांना दूर करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट्स सर्रास वापरलं जातं. मॉस्किटो रिपेलेंट्स (Mosquito Repellent) लिक्विड वापरण्यासाठी सोयीस्कर आणि सर्वात किफायतशीर असल्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मॉस्किटो किलर लिक्विड किंवा कॉइलमुळे डासांपासून सुटका होते, पण मॉस्किटो रिपेलेंट लिक्विड किंवा कॉइल याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, तुम्हाला माहित आहे का? मॉस्किटो रिपेलेंट्स तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.

मॉस्किटो रिपेलंड आरोग्यासाठी घातक

एका संशोधनानुसार, डास मारणारी कॉइल 100 सिगारेट इतकी धोकादायक आहे. बाजारात उपलब्ध असणारे मॉस्किटो किलर लिक्विड आणि कॉईल देखील आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं या संशोधनात समोर आलं आहे.मॉस्किटो कॉईलमधून पीएम 2.5 इतका धूर निघतो. पीएम हे हवेतील कणांचं वर्गीकरण करणारं एकक आहे. 

मॉस्किटो रिपेलेंट्सचा आरोग्यावर काय परिणाम?

मॉस्किटो रिपेलेंट लिक्विडमध्ये काही अतिशय हानिकारक घटक असतात. हे घातक घटक श्वासोच्छवासासोबत शरीरात जाऊन श्वसन मार्गावर परिणाम करतात. यामुळे श्वसन मार्गासंबंधित आजार होण्याचा धोका संभवतो. डास मारणाऱ्या लिक्वीडमध्ये एलॅथ्रिन आणि एयरोसोल यांचं मिश्रण असतं. तसेच बॉटलच्या एका बाजूने कार्बन इलेक्ट्रॉड रॉड असतो. मॉस्किटो रिपेलंट मशीन सुरु केल्यावर रॉड इलेक्ट्रॉड रॉड गरम होऊन आणि गरम हवेसोबत लिक्लिड वाफेच्या रुपाने बाहेर येतं आणि हवेद्वारे पसरतो. हे हवेद्वारे शरीरामध्ये गेल्यावर घसादुखी आणि डोकेदुखी अशा समस्या उद्भवतात.

क्रीमचा परिणाम काय?

काही लोक डासांपासून संरक्षण होण्यासाठी अंगावर क्रीमही लावतात. ही क्रीम आपल्याला डासांपासून वाचवू शकते, पण त्वचेवर त्याचे दुष्परिणाम देखील होतात. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लावलेल्या या क्रीमचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. या क्रिममध्ये आढळणाऱ्या रसायनांमुळे आपल्या त्वचेवर इन्फेक्शनही होऊ शकते. मॉस्किटो रिपेलेंट्समध्ये डीईईटी असते, हे त्वचेवरील वापरण्यासाठी सुरक्षित असते. पण त्यामध्ये रसायनं असतात याचा सतत वापर केल्यास त्वचेवर आणि शरीरावर गंभीर परिणाम होतो.

डासांमुळे कोणकोणते रोग पसरतात?

  • मलेरिया, डेंग्यू, वेस्ट नाईल विषाणू, चिकुनगुनिया, पिवळा ताप आणि झिका हे डासांपासून पसरणारे सामान्य रोग आहेत.
  • डासांपासून संरक्षण होण्यासाठी काय करावे?
  • लांब बाह्यांचे कपडे घाला. 
  • डासांची पैदास होणारी ठिकाणे आणि भंगार साहित्याची विल्हेवाट लावा. 
  • अडगळीच्या ठिकाणी पाणी साचू देऊ नका, यामुळे डासांची पैदास होण्यास मदत होईल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Child Care : वाढत्या वयात मुलांचा आहार कसा असावा? मुलांच्या पोषणाबाबत महत्वाच्या टिप्स जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget