एक्स्प्लोर

Make Up Tips : गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रीम लावताय? आताच थांबा, किडनीवर होतोय परिणाम? डॉक्टर म्हणतात...

Make Up Tips : बरेच लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात फेअरनेस क्रीम वापरतात. पण नुकतीच फेअरनेस क्रीमशी संबंधित दोन गंभीर प्रकरणे समोर आली आहेत,  ज्यामुळे अशा क्रीमच्या वापरावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Make Up Tips : आपल्या रंग गोरा व्हावा, यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या क्रिम्स वापरत असतात. कारण आपण आहे, तसं स्वीकार करणं हे अनेकांना कठीण जातं. आपल्या आवडत्या अभिनेता -अभिनेत्रीप्रमाणे आपणही सुंदर आणि गोरं दिसावं अशी अनेकांची आशा असते. यासाठी वेगवेगळी उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. भारतात फेअरनेस क्रीमची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि या प्रकारच्या क्रीम लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. बरेच लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात फेअरनेस क्रीम वापरतात. पण नुकतीच फेअरनेस क्रीमशी संबंधित दोन गंभीर प्रकरणे समोर आली आहेत,  ज्यामुळे अशा क्रीमच्या वापरावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे किडनीचा आजार?

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे महाराष्ट्रातील रायगडमधील दोन जणांना किडनीचा आजार झाल्याचं समोर आलं. एक 24 वर्षीय महिला ही गेल्या 8 महिन्यांपासून चेहऱ्यावर फेअरनेस क्रीम लावत होती. एका स्थानिक डॉक्टरांनी या क्रीमबद्दल सांगितल्याची माहिती समोर आली होती. यासोबतच एक 56 वर्षीय व्यक्ती देखील गेल्या 3-4 महिन्यांपासून फेअरनेस क्रीम लावत होता. त्याच्या नाव्हीने त्याला गोरा होण्यासाठी क्रीम लावायला सांगितले

क्रीम लावल्यानंतर शरीर सुजते?

डॉक्टरांनी तपासणी केल्यास, या दोघांकडून वापरत असलेल्या क्रीमच्या लेबलवर नैसर्गिक घटक असल्याचे लिहिले होते. मात्र क्रीम लावल्यानंतर रुग्णांना सूज येऊ लागली, त्यानंतर त्यांनी उपचारासाठी नवी मुंबईतील मेडिकोव्हर हॉस्पिटल गाठले. रुग्णालयातील किडनी विभागाचे प्रमुख डॉ. अमित लंगोटे म्हणाले, 'दोन्ही रुग्णांच्या शरीरावर सूज आणि लघवीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्हाला आढळून आले की त्यांची किडनी निकामी झाली होती आणि त्यात NELL-1 अँटीजेन देखील सापडला होता. तसेच रंग हलका करणारे विषारी आणि जड धातू देखील मूत्रपिंडात आढळले.

डॉक्टर पुढे म्हणाले, 'यानंतर आम्ही कॅन्सरसाठी पुरूष रुग्णाची तातडीने तपासणी केली. रुग्णाच्या रक्तात पाराचे प्रमाण जास्त असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही त्याच्यावर उपचार सुरू केले, त्यानंतर त्याच्या लघवीतील प्रथिनांचे प्रमाण कमी होऊ लागले आणि त्याची किडनी व्यवस्थित काम करू लागली.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना डॉ.लंगोटे म्हणाले की, ते महिला रुग्णावरही उपचार करत आहेत. त्यांनी सांगितले, 'महिला रुग्णाची NELL-1 अँटीजेनची चाचणीही करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली. महिलेने सांगितले की, स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ती विदेशी फेअरनेस क्रीम लावत होती, त्यामुळे तिच्या रक्तातील पारा वाढला होता. या महिलेवरही उपचार सुरू आहेत.

फेअरनेस क्रीमबद्दल डॉक्टरांनी इशारा दिला

डॉक्टर म्हणतात की बरेच लोक FDA (अन्न आणि औषध प्रशासन) द्वारे मंजूर नसलेली क्रीम वापरतात आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. या क्रीममध्ये पारा (Mercury) जास्त प्रमाणात असतो, ज्यामुळे त्वचेतील मेलानोसाइट्स दाबून रंग उजळतात. मर्क्युरीपासून बनवलेल्या फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे किडनी आणि एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून लोकांनी फक्त एफडीएने मान्यता दिलेल्या क्रीम्सचाच वापर करावा, असा सल्ला डॉक्टर देतात. जर कोणाला फेअरनेस क्रीम लावायचे असेल तर त्याने प्रथम एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फेअरनेस क्रीमच्या दुष्परिणामांबद्दलही डॉक्टरांना विचारले पाहिजे.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लेक जाणार सासरला! मुलीच्या लग्नापूर्वी आई-वडिलांनी 'या' गोष्टी जरूर सांगाव्या, जोडीदार आयुष्यभर आनंदात ठेवेल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget