Maha Kumbh 2025: कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांनो.. भारतीय रेल्वेकडून महाकुंभ स्पेशल टूर पॅकेज, बजेटपासून सर्व काही जाणून घ्या
Maha Kumbh 2025: IRCTC ने महाकुंभ स्पेशल टूर पॅकेज सुरू केलं, कोणत्या शहरातून हा प्रवास सुरू होणार? बजेटपासून ते सर्व काही जाणून घ्या..
Maha Kumbh 2025: नवीन वर्ष 2025 हे खूप खास असणार आहे. कारण याच वर्षी जानेवारी महिन्यात महाकुंभमेळ्याचे आयोजन यंदा प्रयागराज येथे होत आहे. असं म्हणतात, कुंभमेळा दरम्यान शाही स्नान केले तर माणसाला मोक्ष मिळतो, त्याची सर्व पापं धुतली जातात. याच कुंभमेळ्याला जाण्यासाठी सध्या अनेकजण बेत आखत आहेत, मात्र एवढ्या गर्दीत प्रयागराजमध्ये हॉटेल किंवा तंबू कसा मिळेल, याची चिंता त्यांना सतावत आहे. अशा लोकांसाठी भारतीय रेल्वेच्या IRCTC ने टूर पॅकेजची सुविधा आणली आहे. बजेटपासून ते सर्व काही जाणून घ्या...
IRCTC कडून संपूर्ण प्रवासाची काळजी
भारतीय रेल्वेने महाकुंभ या पॅकेजेसमध्ये, तुम्हाला प्रयागराज आणि नंतर तंबू किंवा हॉटेलमध्ये जाण्यासाठी वाहनाची काळजी करण्याची गरज नाही. याशिवाय, तुम्हाला कुठेतरी दुसरीकडे राहण्याची गरज भासणार नाही, कारण पॅकेजमध्ये तुमच्यासाठी सर्व सुविधा आधीच दिल्या जातील. तुम्हाला फक्त पॅकेजचे तिकीट बुक करायचे आहे, त्यानंतर तुमच्या संपूर्ण प्रवासाची काळजी घेतली जाईल. ही पॅकेजेस बुक केल्यानंतर तुम्हाला प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही. कारण, तुमच्या गरजेनुसार तुमच्या सुविधांची काळजी पॅकेजमध्ये घेतली जाईल. पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तुम्हाला पॅकेजचे बजेट योग्य वाटले तर तुम्ही टूर पॅकेज बुक करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही ठिकाणांहून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची तपशीलवार माहिती जाणून घ्या
पुण्याहून महाकुंभ यात्रा टूर पॅकेज
- IRCTC ने पुणे ते प्रयागराज अशी खास 'भारत गौरव ट्रेन' सुरू केली आहे.
- ही विशेष ट्रेन 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे.
- प्रवाशांना प्रवासासोबतच जेवण आणि राहण्याची सुविधाही मिळणार आहे.
- तुम्ही पुण्यात राहत असाल आणि महाकुंभला जाण्याची तयारी करत असाल तर तुम्ही या ट्रेनचा लाभ घेऊ शकता.
तिकिटाची किंमत किती?
- पुण्याहून या ट्रेनचे इकॉनॉमी क्लास (स्लीपर) तिकीट 22,940 रुपये आहे.
- मानक वर्ग म्हणजेच 3AC तिकीट 32,440 रुपये आहे.
- तर, कम्फर्ट क्लास 2AC तिकिटाची किंमत 40,130 रुपये आहे.
- या ट्रेनमध्ये 14 डबे आहेत, ज्यात 750 प्रवासी बसू शकतात. पु
- पुणे-प्रयागराज भारत गौरव रेल्वे मार्गामध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड,
- चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, वाराणसी आणि अयोध्या या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.
महाकुंभ यात्रा टूर पॅकेज
- रेल्वेने प्रवास सुरू होईल.
- हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
- हे पॅकेज 17 जानेवारीपासून हैदराबाद येथून सुरू होत आहे. यानंतर तुम्ही दर शुक्रवार आणि रविवारी या पॅकेजसह प्रवास करू शकाल.
- पॅकेज फी - एकट्या प्रवासासाठी पॅकेज फी 45700 रुपये आहे.
- 2 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 28570 रुपये आहे.
- तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 26360 रुपये आहे.
- मुलांसाठी पॅकेज फी 19860 रुपये आहे.
- पॅकेज फीमध्ये 3 दिवसांसाठी हॉटेल आणि नाश्ता आणि 3 दिवस रात्रीचे जेवण समाविष्ट असेल. इतर खर्च तुम्हाला स्वतःलाच करावा लागेल.
- IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करा.
कुंभमेळा स्पेशल टूर पॅकेज
- हे पॅकेज 20 जानेवारीपासून मंडपमपासून सुरू होत आहे. यानंतर तुम्ही दर सोमवारी या पॅकेजसह प्रवास करू शकाल.
- पॅकेज ट्रेनने प्रवास सुरू करेल.
- तुम्ही पॅकेजमध्ये अयोध्या/बोधगया/प्रयागराज/वाराणसीला भेट देऊ शकाल.
- हे पॅकेज 8 रात्री आणि 9 दिवसांसाठी आहे.
- पॅकेज फी- एकट्याने प्रवास करत असल्यास पॅकेज फी 48050 रुपये आहे.
- 2 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 41700 रुपये आहे.
- तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 40300 रुपये आहे.
- मुलांसाठी पॅकेज फी 38050 रुपये आहे.
चेन्नईपासून सुरू होणारे टूर पॅकेज
- 20 जानेवारीपासून चेन्नईतून हे पॅकेजही सुरू होत आहे. यानंतर तुम्ही दर सोमवारी या पॅकेजसह प्रवास करू शकाल.
- पॅकेज ट्रेनने प्रवास सुरू करेल.
- तुम्ही पॅकेजमध्ये नैमिषारण्य/प्रयागराज/वाराणसीला भेट देऊ शकाल.
- हे पॅकेज 8 रात्री आणि 9 दिवसांसाठी आहे.
- पॅकेज फी- एकट्याने प्रवास केल्यास पॅकेज फी 50550 रुपये आहे.
- 2 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 43050 रुपये आहे.
- तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 41800 रुपये आहे.
- मुलांसाठी पॅकेज फी 40450 रुपये आहे.
- भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
हेही वाचा>>>
Mahakumbh 2025: कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेकडून खास संधी! विशेष गाड्यांचे नियोजन, सुविधा, सर्व माहिती येथे जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )