IND vs ENG: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वनडे अन् टी-20 मध्ये आमने सामने येणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
India vs England: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारत आता इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि टी 20 मालिका खेळणार आहे.
India vs England T20 And ODI Series Full Schedule नवी दिल्ली : जानेवारी-फेब्रुवारीमध्ये इंग्लंड क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 सामन्यांची आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. टी-20 सामने सायंकाळी 7 वाजता तर दुपारी 1:30 वाजता सुरु होतील. इंग्लंड विरुद्धची मालिका 22 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पहिली टी 20 मॅच 22 जानेवारीला होणार आहे. इंग्लंडनं टी-20 आणि वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयनं अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 सामने कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबईमध्ये खेळवले जाणार आहेत. तर, एकदिवसीय सामने नागपूर, कटक आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत. 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारीमध्ये टी 20 मालिका होईल. तर, 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली टी 20 मॅच कोलकाता येथे 22 जानेवारीला होईल. सायंकाळी 7 वाजता सर्व सामने सुरु होतील. दुसरी मॅच चेन्नईत 25 जानेवारी, तिसरी मॅच राजकोटला 28 जानेवारी, चौथी मॅच पुण्यात 31 जानेवारी आणि पाचवी मॅच मुंबईत 2 फेब्रुवारीला होईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली मॅच नागपूरमध्ये 6 फेब्रुवारीला दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. दुसरी वनडे 9 फेब्रुवारीला कटकमध्ये तर तिसरी वनडे 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होईल.
इंग्लंडचा टी 20 संघ- जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिल साल्ट, जॅमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेकब बीथल, लियाम लिविंगस्टोन, रेहान अहमद, जॅमी ओवरटन, ब्रायडन कार्से, गस एटकिंसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.
इंग्लंडचा वनडे संघ - जोस बटलर (कॅप्टन -विकेटकीपर), फिल साल्ट, जॅमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, जॅकब बीथल, लियाम लिविंगस्टोन, जॅमी ओवरटन, ब्रायडन कार्से, गस एटकिंसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद
भारतीय संघ कधी जाहीर होणार?
भारतीय क्रिकेट संघाला टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत इंग्लंडविरुद्ध तीन सामने खेळणार आहे. त्यामुळं या मालिकेत भारतीय संघात कुणाला स्थान मिळणार हे पाहावं लागेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील संघात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
इतर बातम्या :