एक्स्प्लोर
Advertisement
या परिसरातील लोकांमध्ये सर्वात जास्त लठ्ठपणाचे प्रमाण
नवी दिल्ली: साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या, किंवा कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये राहणाऱ्या किशोर वयीन मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असते. एका नव्या संशोधनानुसार अशा परिसरातील 25% तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.
कॅन्सर परमनेंट साउदर्न कॅलिफोर्नियाच्या संशोधन विभागाचे देबोराह रोहम यंग यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, तारुण्यात पदार्पण करणाऱ्या व्यक्तींमध्ये वजन वाढण्याची अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख कारण त्यांचे बाहेरील खाणे आहे.
या संशोधनासाठी शोधकर्त्यांनी 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या विविध वर्गातील सुमारे 22 हजार 823 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्यांचे जवळपास चार वर्षे परिक्षण करण्यात आले.
चार वर्षाच्या अध्ययनानंतर जे व्यक्ती साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या भागात राहात होते, त्या भागातील जवळपास 23% व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. तर कमी उत्पन्न असलेल्या परिसरातील 2% व्यक्तींचे वजन वाढल्याचे दिसून आले. याशिवाय महिला किंवा कृष्णवर्णीय पुरुष आणि गोऱ्या व्यक्तींच्या तुलनेत 1.7 आणि 1.3 टक्के व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचा अधिक धोका होता.
यंग ने पेड्रियाट्रिक ओबेसिटी नावाच्या पत्रिकेत हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला असून, यामध्ये, ''ज्या भागात मुलभूत सुविधा मिळत नाहीत, त्या भागात लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचा धोका जास्त असतो.'' असे नमुद करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement