(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi on Nashik Agniveer : 'शहीद झाल्यानंतर भेदभाव का?', नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पीएम मोदींना सवाल
Rahul Gandhi on Nashik Agniveer : जेव्हा दोघेही सैनिकांची जबाबदारी आणि बलिदान समान आहे, मग त्यांच्या हौतात्म्यानंतर हा भेदभाव का? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे.
Nashik Military Camp Explosion : नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांच्या बलिदानानंतर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी शहीद झाल्यानंतर भेदभाव कशासाठी अशी विचारणा केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीर गोहिल विश्वराज सिंह आणि सैफत शिट यांचे निधन ही एक वेदनादायक घटना आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी तीव्र संवेदना आहे. या घटनेने पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्याचे उत्तर भाजपला देता येत नाही." सरकार अपयशी ठरले आहे.
पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्र्यांना सवाल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारले की, "गोहिल आणि सैफ यांच्या कुटुंबीयांना वेळेवर नुकसान भरपाई मिळेल का, जी इतर कोणत्याही जवानाच्या हौतात्म्याइतकी आहे? अग्निवीरांच्या कुटुंबीयांना पेन्शन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? जेव्हा दोघेही सैनिकांची जबाबदारी आणि बलिदान समान आहे, मग त्यांच्या हौतात्म्यानंतर हा भेदभाव का?
नासिक में ट्रेनिंग के दौरान दो अग्निवीर - गोहिल विश्वराजसिंह और सैफत शित - का निधन एक दर्दनाक घटना है। उनके परिवारों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 13, 2024
यह घटना एक बार फिर अग्निवीर योजना पर गंभीर सवाल उठाती है, जिनका जवाब देने में BJP सरकार असफल रही है।
- क्या गोहिल और सैफत के…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना अग्निपथ योजना लष्करावर अन्याय असून आपल्या शूर जवानांच्या हौतात्म्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे. एका सैनिकाचा जीव दुसऱ्या जवानाच्या जीवापेक्षा अधिक मौल्यवान का आहे, याचे उत्तर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी द्यावे, असा सवाल त्यांनी केला.
नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शिट या दोन अग्निवीरांचा मृत्यू ही वेदनादायक घटना आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना.
जय जवान आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला आवाहन करत सांगितले की, या अन्यायाविरुद्ध एकत्र उभे राहू या. भाजप सरकारची अग्निवीर योजना हटवण्यासाठी आणि देशातील तरुण आणि लष्कराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच आमच्या जय जवान आंदोलनात सामील व्हा.
नेमकं काय घडलं?
नाशिकमधील आर्टिलरी सेंटरच्या 'फायरिंग रेंज'मध्ये सरावाला सुरूवात झाली. 'इंडियन फिल्डगन' द्वारे 'फायरिंग'चा सराव सुरू होता. तिथे लावलेल्या प्रत्येक तोफांजवळ सात अग्निवीरांचा गट तोफेत गोळा टाकून 'लक्ष्य' भेदत होता. त्यादरम्यान, चार क्रमांकाच्या तोफेत बॉम्ब भरताना स्फोट झाला. बॉम्बचे तुकडे गोहिल व सैफत यांच्या शरीरात शिरल्याने दोघेही मृत पावले.'फायरिंग'च्या सरावावेळी स्फोट झाल्याने जखमी झालेल्या गोहित, सैफत व अप्पा यांना नाईक सचिन चव्हाण, नायब सुभेदार सुदेश मामेन, सुंदरराज यांनी लष्करी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी गोहिल व सैफत यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या