Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपीला 11 वर्षांपूर्वीच कुटुंबाने घरातून केलं होत बेदखल, आजीने सांगितली हकीकत
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे धागेदोरे हरियाणातील कैथलशी जोडले जात आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांच्या दाव्यानुसार ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत.
Baba Siddique Shot Dead: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे हरियाणातील कैथलशी जोडले जात आहेत. या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांच्या दाव्यानुसार ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत. या दोन संशयितांपैकी एक हरियाणाचा गुरमेल बलजीत सिंह आहे.आरोपी गुरमेल बलजीत सिंहच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी गुरमेल बलजीत सिंहला घरातून हाकलून दिले होते. जेव्हापासून आम्ही त्याला घराबाहेर काढले तेव्हापासून त्याच्या कोणत्याही कामाशी आमचा काहीही संबंध नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
गुरमेल बलजीत सिंह हा कैथल नारद, हरियाणाचा रहिवासी आहे. कुटुंबाच्या नावावर त्यांच्या घरात फक्त त्यांची वृद्ध आजी राहतात. IANS शी बोलताना गुरमेल बलजीत सिंहच्या आजीने सांगितले की, सुमारे 11 वर्षांपूर्वी तिने गुरमेल बलजीत सिंहला तिच्या घरातून हाकलून दिले होते.60 वर्षीय फुली देवी (गुरमेलची आजी) यांनी IANS शी बोलताना म्हणाली की, तो माझा नातू होता. पण माझा त्याच्याशी काहीही संबध नाही.
गुरमेलची आजी मीडियाशी बोलताना काय म्हणाली?
तुम्ही त्याला मारा किंवा सोडून द्या, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे गुरमेलच्या वृद्ध आजीने सांगितले. गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्याचा कोणताही पत्ता नव्हता. तेव्हापासून त्याचा ना फोन आला ना तो घरी आला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असून गुरमेल बरेच दिवसांपासून त्याच्या गावात राहत नव्हता. गुरमेल बलजीत सिंहच्या आजीने सांगितले की, घरात फक्त ती आणि तिचा एक नातू राहतो.
मुंबई गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे
आरोपी गुरमेल हा २०२२ मध्ये तरुणाच्या हत्येप्रकरणी कैथल तुरुंगात बंद होता. त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर तो मुंबईतील लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांच्या संपर्कात आला. गुरमेल कैथल तुरुंगातच लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांच्या संपर्कात आल्याचेही सांगितले जात आहे.दीड ते दोन महिने मुंबईत राहून आरोपींनी त्याच्या साथीदारांसह बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची चाचपणी केली होती. सध्या मुंबई गुन्हे शाखेची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बाबा सिद्दिकी यांची हत्या नेमकी का झाली?
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाली, असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने वा अधिकृत व्यक्तीने माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्या हत्येला एसआरए प्रकल्पाच्या वादाची किनार आहे. दुसरीकडे सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे बिश्नोई गँगशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने तपास करत आहेत.