Side Effects of Jamun : 'या' 5 गोष्टींबरोबर जांभूळ खाणे टाळा; होऊ शकतात घातक परिणाम
Jamun Side Effects : पोषक तत्वांनी समृद्ध जांभूळ हे सुपरफूड सारखे काम करते. परंतु जांभूळ खाण्याची योग्य वेळ कोणती हे ही जाणून घेणे गरजेचे आहे.
Jamun Benefits and Side Effects : सध्या पावसाळा सुरु झाला आहे. आणि या दरम्यान बाजारात हमखास उपलब्ध होणारं फळ म्हणजे जांभूळ. अर्थात रंगाळे काळे आणि जांभळे दिसणारे जांभूळ चवीला आंबट-गोड असतात. त्यामुळे लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण जांभूळ अगदी आवडीने खातात. जांभूळ खाल्ल्याने त्याचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदेही आहेत. जसे की, अॅनिमियामध्ये हिमोग्लोबिन वाढण्यापासून हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी त्याचे सेवन फायदेशीर आहे. परंतु काही वेळा चुकीच्या पद्धतीने जांभळाचे सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जांभूळ खाण्याची योग्य पद्धत कोणती ती जाणून घ्या.
रिकाम्या पोटी खाऊ नका : रिकाम्या पोटी जांभूळ खाल्ल्यानेही तुम्हाला नुकसान होऊ शकते. तर काही जांभळं ही चवीला आंबट असल्यामुळे सकाळी प्रथम खाल्ल्याने अॅसिडीटी आणि पोटदुखी होऊ शकते. जांभळच्या सेवनाने पचनास मदत होते, त्यामुळे जेवल्यानंतरच जांभूळ खावे.
जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका : जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे डायरिया, अपचन यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जांभूळ खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनी पाणी पिणे चांगले.
हळदीचे पदार्थ खाऊ नका : जांभूळ खाल्ल्यानंतर ताबडतोब हळदयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. जांभूळ आणि हळद एकत्र सेवन केल्याने या दोन्ही गोष्टींची प्रतिक्रिया होऊन पोटाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही जांभळाचे सेवन करत असाल तर 30 मिनिटांनंतरच हळदीसोबत काहीतरी खा.
दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नका : जांभूळ खाल्ल्यानंतर दूध पिणे किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणे देखील तुम्हाला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे गॅस, अपचन आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. जांभळाचे पूर्ण फायदे मिळविण्यासाठी जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका.
लोणचे खाऊ नका : जांभूळ खाल्ल्यानंतर लोणचे खाऊ नका. या दोन्ही गोष्टी शरीरात रिअॅक्ट होऊन पोटाच्या समस्या निर्माण करू शकतात.
जांभूळ खाण्याची योग्य वेळ कोणती?
जांभळाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जांभूळमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडेंटमुळे ते खाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. मात्र, जांभळाचे संपूर्ण फायदे जर तुम्हाला हवे असतील तर जांभूळ नेमक्या कोणत्या वेळी खावे, जांभूळ खाण्याची योग्य वेळ कोणती हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, जांभूळ दिवसाच्या कोणत्याही वेळी खा, परंतु रिकाम्या पोटी खाऊ नका. अन्न खाल्ल्यानंतर जांभळाचे सेवन करणे योग्य राहील. हे चयापचय वाढवेल आणि पचनास देखील मदत करेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :