Coconut water Benefits : नारळ पाणी प्यायल्याने फक्त रोगप्रतिकार शक्तीच नाही तर मिळतात 'हे' देखील फायदे
Coconut Water For Health : नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यांपासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. नारळाच्या पाण्यात 94 टक्के पाणी असते
![Coconut water Benefits : नारळ पाणी प्यायल्याने फक्त रोगप्रतिकार शक्तीच नाही तर मिळतात 'हे' देखील फायदे coconut water benefits good for immunity glowing skin and more marathi news Coconut water Benefits : नारळ पाणी प्यायल्याने फक्त रोगप्रतिकार शक्तीच नाही तर मिळतात 'हे' देखील फायदे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2017/12/04153919/coconut-water.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coconut Water For Health : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. मात्र, तरीही कमी पाऊस पडत असल्या कारणाने जास्त उन्हाळा जाणवतो. अशा वेळी शरीराला हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं आहे. उन्हाळ्यात अनेकजण नारळ पाणी पिण्यास प्राधान्य देतात. नारळ पाणी फक्त चवीलाच गोड नसते तर त्यामुळे अनेक फायदेही मिळतात. नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यांपासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. इतकेच नाही तर, नारळाच्या पाण्यात 94 टक्के पाणी असते, जे शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही तर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीसुद्धा नारळ पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण त्यात फॅटचे प्रमाण फार कमी असते. नारळ पाणी पिण्याचे इतर अनेक फायदे जाणून घेऊया.
उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे :
सर्वात महत्वाचं म्हणजे नारळ पाणी तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात ते पिण्यास प्राधान्य देतात.
उर्जा वाढवते : उष्णतेमुळे आपल्या शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते, ज्याला नारळ पाणी वाढवण्यास मदत करते. तसेच तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते.
शरीरात इन्सुलिनही काम करते : नारळ पाण्याच्या सेवनाने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. ज्यामुळे मधुमेहाची समस्या टाळता येते.
किडनीसाठी फायदेशीर : नारळ पाण्याचे सेवन केल्याने स्टोन क्रिस्टल्स कमी होण्यास मदत होते. त्याच वेळी, ते मूत्राद्वारे मूत्रपिंडातील दगड देखील काढून टाकते.
तजेलदार त्वचेसाठी फायदेशीर : नारळाचे पाणी आरोग्यासाठी तर चांगले असतेच पण ते त्वचेसाठीही चांगले असते. ते त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. नारळ पिण्याव्यतिरिक्त, जर तुम्ही ते चेहऱ्यावर लावले तर ते तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम देखील दूर करू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)