एक्स्प्लोर

International Yoga Day 2023 : 'या' दोन योगासनांमुळे गर्भाशय राहिल निरोगी, गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका टळेल वाचा सविस्तर

नियमीत योगासन केल्याने अनेक आजार दूर होतात. महिलांनी रोजच्या धावपळीच्या जीवनात योगा करणे खूप गरजेचे आहे. यामुळे महिलांच्या मानसिक आरोग्यासोबतच शारिरीक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Yoga Day : आज जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत योगाचे महत्व लोकांना सांगितले जाते. योगासनाने मनासोबतच शारिरीक आरोग्य सुधारते.आयुर्वेदातही योगाचे महत्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी योगा दिनाच्या विविध थीम असतात. या ही वेळी मानवता या थीमवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. अनेक आजारांवरचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे योगा. विशेषत: महिलांसाठी योगा करणे आवश्यक आहे. कारण काही काळानंतर महिलांना गर्भाशय, ओवेरियन तसेच स्तनाच्या कर्करोगाशी संघर्ष करावा लागतो. अशा अनेक महिला आहेत ज्या योग्य वेळी गर्भधारणा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, एक योग आहे ज्यामुळे तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. खास योग दिनानिमित्त योगाच्या माध्यमातून गर्भाशय आणि अंडाशय कसे निरोगी ठेवता येऊ शकते.यासाठी कोणती योगासने करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया.

तितली आसन(Butterfly Pose)

गर्भाशय आणि अंडाशय निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी नियमित तितली आसन करणे गरजेचे आहे. या आसनाने तुमचे पाय लवचिक होतील तसेच गर्भाशय आणि अंडाशय निरोगी राहण्यासाठी मदत होते.सर्वप्रथम सूर्याकडे तोंड करून बसा. यानंतर पाय अगदी सरळ ठेवा आणि मग पायाचे गुडघे वाकवून पायांचे तळवे एकमेकांशी जोडून घ्या. आता हाताने पायाचे तळवे धरा. यानंतर दोन्ही डोळे बंद करा. फुलपाखरासारखे दोन्ही पाय हलवा. हे आसन पाच मिनिटे करा. ज्या लोकांना गुडघ्याच्या तक्रारी आहेत त्यांनाही तात्काळ आराम मिळेल.

सेतूबंधासन (Bridge Pose)

या आसनामुळे आपल्या शरीर-मनाचा उत्तम समन्वय साधता येतो. सेतूबंधासन आपल्या शरीरातील ताण दूर करून आराम मिळवून देतो.नावाप्रमाणेच सेतुबंधासन म्हणजे संपूर्ण शरीर पुलासारखे बनवणे. हे आसन केल्याने पोटाचे, पाठीचे, पायांचे, हातांचे स्नायू बळकट होतात, तसेच गर्भाशयही निरोगी राहते. हे आसन केल्याने ज्या महिला गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांना खूप मदत मिळेल.  दीर्घ श्वास घ्या. यानंतर दोन्ही हात पायांच्या गुडघ्यांपासून दूर ठेवून तळवे जमिनीवर ठेवा. त्यानंतर तुमचे दोन्ही तळवे दुमडून नितंब खांद्यापर्यंत उचलण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वास रोखून धरा आणि या स्थितीत रहा. आता तुमचे पाय सरळ करा. आपल्याला हे पाच वेळा पुन्हा करावे लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या

International Yoga Day 2023: ब्लड प्रेशर, डायबिटीजवर रामबाण उपाय ठरतील 'ही' 3 योगासनं; दिवसभरात फक्त 15 मिनिटं काढा अन् नक्की ट्राय करा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Women's Day Wishes 2026 : जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
Children's Screen Time : वाढता स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा
वाढता स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा
Obesity: वजन वाढतयं..बिनधास्त राहणं पडेल महागात! नियमित आरोग्य तपासणी करता का? तज्ज्ञ सांगतात...
वजन वाढतयं..बिनधास्त राहणं पडेल महागात! नियमित आरोग्य तपासणी करता का? तज्ज्ञ सांगतात...
March Month Born Zodiac Personality : मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Embed widget