(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Important days in 5th April : 5 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनांचा आढावा
Important days in 5th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. त्यानुसार प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
Important days in 5th April : एप्रिल महिना सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 5 एप्रिलचे दिनविशेष.
1908 : बाबू जगजीवनराम यांचा जन्म
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री आणि भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम हे मूळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री राहण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली.
1922 : आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन
पंडिता रमाबाई - (23 एप्रिल 1858 - 5 एप्रिल 1922) पंडिता रमाबाई या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.
पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. पंडिता रमाबाई यांनी त्यांचं आयुष्य महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अर्पण केलं. स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ही दोन त्यांची मुख्य उद्दिष्ट होती. स्त्री शिक्षणामध्ये रमाबाईंनी लावलेला हातभारामुळे त्यांना ब्रिटीश राजवटद्वारे पुरस्कार जाहीर करण्यात आला.
1993 : दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री
दिव्या भारती यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबई येथे झाला होता. 9 व्या इयत्तेपर्यंत शिकल्यानंतर दिव्या यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
1999 : भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना
भारताच्या अतिशय समृद्ध अशा सागरी व्यापार आणि जहाज निर्माण क्षेत्राला ब्रिटीश सत्तेने अनेक वर्षे हेतुपुरस्सर प्रतिबंध केल्यानंतर दिनांक 5 एप्रिल 1919 रोजी पहिले भारतीय जहाज एस. एस. लॉयल्टी मुंबई येथून लंडनला रवाना झाले. त्यामुळे त्या दिवसाला आधुनिक नौकावहनाच्या पुनरुज्जीवनाचा आरंभ मानून राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो.
2000 : डी. डी. – 10 या मराठी उपग्रह वाहिनीचे नामकरण
15 ऑगस्ट 1994 ला झाली. ही पहिली मराठी उपग्रह वाहिनी. ही वाहिनी प्रथम DD-10 या नावाने लोकप्रिय होती, त्यानंतर या वाहिनीचे दिनांक 05 एप्रिल 2020 ला अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते DD-10 चे दूरदर्शन सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
राष्ट्रीय सागरी दिन :
राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी 5 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. पर्यावरणदृष्ट्या सकारात्मक पद्धतीचा प्रतिसाद देणारा दृष्टिकोन दर्शविण्याकरिता भारतात दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो. आंतरमहाद्वीपीय वाणिज्य आणि जागतिक अर्थव्यवस्थेला जगातील एका कोपऱ्यातून दुसर्या कोपऱ्यात पोहोचवण्यास उपयुक्त मार्ग अवलंबणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Important days in 4th April : 4 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनांचा आढावा
- Important Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha