Important days in 27th April : 27 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
Important days in 27th April : एप्रिल महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
Important days in 27th April : एप्रिल महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 27 एप्रिलचे दिनविशेष.
1883 : नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म.
मराठीतील पुरोगामी नाटककार आणि कादंबरीकार. मामा वरेरकर ह्या नावाने विशेष प्रसिद्ध. कुंजविहारी (1914) हे नाटक लिहून. त्यांच्या अन्य नाटकांत हाच मुलाचा बाप (1917), संन्याशाचा संसार (1920), सत्तेचे गुलाम (1922), करीन ती पूर्व (1927), सोन्याचा कळस (1932), उडती पाखरे (1941), सारस्वत (1942), जिवा-शिवाची भेट (1950), अ-पूर्व बंगाल (1953) आणि भूमिकन्या सीता (1955) ही काही विशेष उल्लेखनीय होत. ‘जीवनासाठी कला’ही वरेरकरांची भूमिका होती. 1956 साली भारत सरकारकडून पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला. तर 1959 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.
1980 : पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन.
महाराष्ट्रतील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक. शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखे−पाटील यांनी यशस्वी रीत्या राबविल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावी, म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद 1956 साली प्रवरानगर येथे भरविली. प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना आणि विखे−पाटील हे भारतातील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनले. विखे−पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 1961 मध्ये ‘पद्मश्री’ हा किताब दिला.
2002 : बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक रुथ हँडलर यांचे निधन.
रुथ मारियाना हँडलर ह्या एक अमेरिकन व्यावसायिक महिला आणि शोधक होत्या. त्यांनी खेळणी उत्पादक 'मॅटेल' ही खेळण्याची कंपनी स्थापन केली. 1959 मध्ये, त्यांनी बार्बी डॉलचा शोध लावला. ज्याने जगभरात एक अब्जाहून अधिक खेळणी विकली. त्या जगातील सर्वात मोठी खेळणी कंपनीची संस्थापक आणि अध्यक्षा होत्या.
2017 : भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन.
2017 साली साठच्या दशकातील सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता आणि राजकारणी तसेच, पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघाचे माजी खासदार विनोद खन्ना यांचे निधन झाले. 1968 साली 'मन का मीत' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधी ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण 137 चित्रपटांपैकी 'लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, मेरा गांव मेरा देश, कच्चे धागे, परवरिश, अमर अकबर अॅन्थनी, मुकद्दर का सिकंदर (इ.स. 1978), द बर्निंग ट्रेन (इ.स. 1980) हे चित्रपट विशेष गाजले. 2017 साली विनोद खन्ना यांना (मरणोत्तर) दादासाहेब पुरस्कार देण्यात आला.
2005 : जगातील सर्वात मोठे विमान A-380 ने पहिले चाचणी उड्डाण केले.
27 एप्रिल 2005 रोजी एअर बेस निर्मित वाइड-बॉडी विमान ए-380 हे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान आहे. या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. Airbus A380 हे एक मोठे वाइड-बॉडी विमान आहे जे Airbus द्वारे विकसित आणि उत्पादित केले गेले आहे. हे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान आहे.
1912 : पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय अभिनेत्री जोहरा मुमताज सेगल यांचा जन्मदिन.
जोहरा मुमताज सेगल एक भारतीय अभिनेत्री आणि कोरिओग्राफर होत्या. त्यांनी युनायटेड स्टेट्स आणि जपान सारख्या देशांमध्ये नृत्य सादर केल्यानंतर उदय शंकर यांच्या गटातील नृत्यांगना म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. करिअरच्या 60 वर्षांहून अधिक काळात अभिनेत्री म्हणून त्या बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांमध्ये दिसल्या. त्यांना 1963 मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, 1998 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये कालिदास सन्मान मिळाले. 2004 मध्ये संगीत नाटक अकादमी, जी भारतीय संगीत, नृत्य आणि नाट्य कलेतील राष्ट्रीय अकादमी आहे, त्याच्या आजीवन कर्तृत्वासाठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप ह्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. 2010 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :