Winter Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करण्याचा 'हा' सर्वात सोपा उपाय; 'या' पद्धतीने मध वापरा
Winter Weight Loss Tips : हिवाळ्यात गोड आणि कॅलरीज असलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यामुळे या ऋतूत वजन कमी करणं तसं कठीणच आहे.
Winter Weight Loss Tips : हिवाळ्यात गोड आणि कॅलरीज असलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यामुळे या ऋतूत वजन कमी करणं तसं कठीणच आहे. इतर वेळीही वजन कमी करणं एक आव्हान आहे. मात्र, हिवाळ्यात वजन नियंत्रित ठेवणं तुलनेने कठीण मानलं जातं. कारण हिवाळ्यात आपल्याला भूकही जास्त लागते आणि त्यावर ताबा मिळविणे केवळ अशक्य असते.
हिवाळा हा थंडीचा महिना असल्याने सकाळ-संध्याकाळ हवेत गारठा असतो. तसेच, बाहेर धुकेही असतात. त्यामुळे या कारणाने अनेकजण जॉगिंग, सायकलिंग, वॉकिंग यांसारखे प्रकार करणं थांबवतात. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या तुलनेत पाणीही कमी प्यायले जाते, त्यामुळे शरीर डिटॉक्स करण्यात समस्या निर्माण होते. याचाच अर्थ असे घटक तयार होतात, ज्यामुळे हिवाळ्यात वजन कमी करण्याचा प्रवास त्रासदायक ठरतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक असाच सोपा उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल.
हिवाळ्यात वजन कसे कमी करावे?
हिवाळ्यात वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मध. एक चमचा मध घेऊन पेय तयार करा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. पेय तयार करण्याची पद्धत कशी ते जाणून घ्या.
- सकाळी एक ग्लास पाणी प्या.
- हिवाळ्यात कोमट पाणी प्या.
- या पाण्यात एक चमचा मध मिसळून प्या.
- हिवाळा ऋतू संपेपर्यंत तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकता.
मध वजन कसे कमी करते?
जेव्हा तुम्ही मध पाण्यात मिसळून पिता आणि नमूद केलेल्या पद्धतीनुसार दररोज रिकाम्या पोटी त्याचे सेवन करता. तेव्हा तुमचे चयापचय वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे अनावश्यक चरबी कमी होते.
वजन कमी करण्यासोबतच मधाचे सेवन हिवाळ्यात इतर अनेक समस्यांपासून बचाव करते. उदाहरणार्थ, खोकला आणि हाडांच्या वेदनांमध्ये आराम आहे. यासाठी एक चमचा मध, अर्धा चमचा हळद आणि एक काळी मिरी पावडर मिसळून रोज सेवन करा.
'या' गोष्टी लक्षात ठेवा
जोपर्यंत तुम्ही दररोज 7 तासांची झोप घेत नाही तोपर्यंत तुम्हाला शरीरात बदल दिसून येणार नाही. तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं आहे तर तुम्ही खाण्यापिण्याबरोबरच तुमच्या झोपेची आणि आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :