Health Tips : तुमच्याही टाचांना भेगा पडतायत? वाढलेल्या भेगांना सॉफ्ट करण्यासाठी 'या' सोप्या पद्धती फॉलो करा
Tips For Cracked Heels : जेव्हा टाचांच्या सभोवतालची त्वचा जाड आणि कोरडी होते, ज्यामुळे टाचांना तडे जाऊ लागतात.

Tips For Cracked Heels : थंडीचे दिवस (Winter Season) हळूहळू सुरु व्हायला लागले आहेत. या दिवसांत एक समस्या अशी आहे जी जवळपास सर्वांनाच जाणवते ती म्हणजे टाचांना भेगा (Cracked Heels) पडणे. टाचांना भेगा पडल्यामुळे एक विचित्र समस्या निर्माण होते. कधी कधी सॅंडल घालताना अस्वस्थ वाटते, त्वचा सोलून त्यांना क्रॅक जाण्याची भीती असते. जेव्हा टाचांच्या सभोवतालची त्वचा जाड आणि कोरडी होते, ज्यामुळे टाचांना तडे जाऊ लागतात. हिवाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. याला सामोरे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे टाचांमध्ये ओलावा ठेवणे.
रात्री झोपण्यापूर्वी, 20 मिनिटे कोमट पाण्यात पाय ठेवा. नंतर प्युमिस स्टोन किंवा ब्रशने स्वच्छ करा. यानंतर, पाय स्वच्छ पाण्याने धुवा आणि टॉवेलने नीट पुसून घ्या. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. आणि सॉफ्ट मोजे घाला आणि शांत झोप घ्या. सकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या टाचांमध्ये फरक जाणवेल. असे नियमित केल्याने काही दिवसांतच तुमच्या टाचा मऊ आणि सुंदर होतील.
कोरफड आणि ग्लिसरीन वापरा.
एलोवेरा जेल एका भांड्यात घ्या आणि त्यात एक चमचा ग्लिसरीन घालून मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. कोमट पाण्यात पाय स्वच्छ करा आणि ही पेस्ट भेगा पडलेल्या टाचांवर लावा. यामुळे टाचांमध्ये ओलावा टिकून राहील आणि त्यांना तडे जाणार नाहीत.
- झोपताना फक्त सुती मोजे घाला. हे पायांच्या त्वचेला श्वास घेण्यास आणि मॉइस्चराइज करण्यास मदत करतील.
- दररोज आंघोळ केल्यानंतर, टॉवेलच्या मदतीने आपल्या टाचांना पुसून घ्या.
- भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील आणि त्वचेची आर्द्रता टिकून राहील.
- खोबरेल तेल देखील तुम्ही वापरू शकता. हे चांगले मॉइश्चरायझिंग एजंट आहेत. यामुळे क्रॅक झालेल्या टाचांना लवकर आराम मिळेल.
- क्रॅक केलेल्या टाचांवर सॉफ्ट ट्यूब पट्टी देखील लावली जाते, जी स्प्रेसारखी असते. ते क्रॅकवर एक सील तयार करतात आणि बॅक्टेरिया आणि घाणीपासून तुमच्या पायांचे संरक्षण करतात, ज्यामुळे तुम्हाला वेदना देखील कमी होतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























