Holidays New Year 2025: नववर्ष 2025 मध्ये किती दिवस शाळा, ऑफिस आणि बँका बंद राहतील? लाँग वीकेंड किती मिळतील? जाणून घ्या..
Holidays New Year 2025: नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार? 2025 वर्षी किती दिवस शाळा, ऑफिस आणि बँका बंद राहतील? लाँग वीकेंड किती मिळतील? जाणून घ्या..
Holidays New Year 2025: नवीन वर्ष लवकरच येत आहे. या निमित्ताने अनेकांना पुढच्या वर्षी किती सुट्ट्या मिळणार हे पाहण्याची उत्सुकता असते, नवीन वर्षाचे कॅलेंडर आले की सर्वात आधी आपण गणपती, दिवाळी, वाढदिवस, असे महत्त्वाचे सण हे सगळ्यात पहिल्यांदा पाहतो. तर यंदा 2025 मध्ये गुढी पाडवा, रामनवमी, मोहरम आणि प्रजासत्ताक दिन यांसारखे सण रविवारी येणार आहेत. अशात राज्य सरकारने पुढील वर्षीच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने 24 सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त 23 ऑक्टोबर 2025 (गुरुवार) रोजी भाऊबीज, ही पुढील संस्थांसाठी अतिरिक्त सुट्टी म्हणून घोषित केली आहे. यावर्षी एकूण 52 रविवार आहेत. तसेच, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या स्वरुपात 26 शनिवार सुट्ट्या असतील.
2025 वर्षातील सुट्ट्यांची यादी
प्रजासत्ताक दिन-26 जानेवारी - रविवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती-19 फेब्रुवारी - गुरुवार
महाशिवरात्री-26 फेब्रुवारी-बुधवार
होळी (दुसरा दिवस)-14 मार्च-शुक्रवार
गुढीपाडवा-30 मार्च-रविवार
रमजान-ईद-31 मार्च-सोमवार
राम नवमी-6 एप्रिल-रविवार
महावीर जयंती-10 एप्रिल-गुरुवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-14 एप्रिल-सोमवार
गुड फ्रायडे-18 एप्रिल-शुक्रवार
महाराष्ट्र दिन- 1 मे - गुरुवार
बुद्ध पौर्णिमा-12 मे-सोमवार
बकरी ईद-7 जून-शनिवार
मोहरम-6 जुलै-रविवार
स्वातंत्र्य दिन-15ऑगस्ट-शुक्रवार
पारसी नववर्ष-15ऑगस्ट-शुक्रवार
गणेश चतुर्थी-27 ऑगस्ट-बुधवार
ईद-ए-मिलाद-5 सप्टेंबर-शुक्रवार
महात्मा गांधी जयंती-2 ऑक्टोबर-गुरुवार
दसरा-2ऑक्टोबर-गुरुवार
दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन-21 ऑक्टोबर-मंगळवार
दिवाळी (बलिप्रतिपदा)-22 ऑक्टोबर-बुधवार
गुरु नानक जयंती-5 नोव्हेंबर-बुधवार
ख्रिसमस-25 डिसेंबर
2025 वर्षात लाँग वीकेंड किती असतील?
लाँग वीकेंडबद्दल बोलायचं झालं तर 11 आणि 12 जानेवारीला शनिवार व रविवार सुट्टी आहे. 13 जानेवारीला सुट्टी घेतली तर 14 तारखेला मकर संक्रांतीची सुट्टी मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही 11 ते 14 जानेवारी या कालावधीत लाँग वीकेंडवर जाऊ शकता. 14 मार्चला होळी असून 15 आणि 16 फेब्रुवारीला शनिवार आणि रविवार सुट्टी आहे. अशा प्रकारे तीन दिवस लांब ड्राइव्हवर जाता येते. त्याचप्रमाणे 29 आणि 30 मार्चला शनिवार-रविवार आणि 31 मार्चला ईद-उल-फित्रची सुट्टी आहे. म्हणजे तीन सुट्या एकत्र येत आहेत.
शेअर बाजार 14 दिवस बंद राहणार?
बहुतेक सुट्ट्या जानेवारी, एप्रिल, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये उपलब्ध आहेत. जानेवारीमध्ये गुरु गोविंद सिंग जयंती, मकर संक्रांती, लोहरी, पोंगल आणि प्रजासत्ताक दिन साजरे केले जातील. एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात, महावीर जयंती आणि गुड फ्रायडे आहे. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, जन्माष्टमी आहेत. ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीपासून सुट्ट्या सुरू होत आहेत. या महिन्यात दसरा, दिवाळी आणि छठच्या सुट्ट्या असतील. 2025 मध्ये कर्मचाऱ्यांना काही लाँग वीकेंड देखील मिळतील. जानेवारी, मार्च, एप्रिल, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये सलग तीन ते चार सुट्या असतील. 2025 मध्ये शनिवार आणि रविवारच्या नियमित सुट्ट्यांव्यतिरिक्त शेअर बाजार 14 दिवस बंद राहणार आहे. याचा अर्थ शेअर बाजारातही 14 दिवस सुट्टी असेल.
हेही वाचा>>>
January 2025 Bank Holidays: नववर्षात बँक संबंधित काम असेल, तर लक्ष द्या! जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर; किती दिवस बँका बंद राहणार?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )