(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Holi 2022 : होळी कोणत्या तारखेला आहे? जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि बरंच काही...
Holi 2022 : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे. या निमित्ताने जाणून घ्या होळीचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे.
Holi 2022 : रंगांचा सण म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजेच होळीचा (Holi 2022) सण. या दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. भारतातील सर्वच राज्यांत होळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. पहिला सण हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
होलिका दहन कधी होणार?
होलिकेच्या अग्नीत अहंकार आणि वाईटाचा अंत होतो असे म्हणतात. होळीच्या पौराणिक कथेनुसार भाद्र काळात होलिका दहन अशुभ मानले जाते. त्याचबरोबर होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेलाच करावे असे मानले जाते.
होळीची तारीख आणि मुहूर्त (Holi Date 2022) :
यंदा होलिका दहन 17 मार्च रोजी होणार आहे. एका दिवसानंतर 18 मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाणार आहे. यावेळी होलिका दहनाचा मुहूर्त रात्री 9.03 ते 13.10 पर्यंत असेल. 17 मार्च रोजी पहाटे 1.29 वाजता पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 18 मार्च रोजी पहाटे 12:46 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होईल.
होलिका दहनाचा पूजाविधी :
होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने तीन ते सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते.
होळीची पौराणिक कथा (Holi Historical Importance) :
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी हिरण्यकशिपू नावाचा राक्षस राजा होता. अहंकारी राहून त्याने स्वतःचा देव असल्याचा दावा केला होता. एवढेच नाही तर हिरण्यकशिपूने राज्यात देवाचे नाव घेण्यास बंदी घातली होती. पण हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवंताचा भक्त होता. त्याचवेळी हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला अग्नीत भस्म न होण्याचे वरदान होते. एकदा हिरण्यकशिपूने होलिकाला प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा दिली. पण आगीत बसल्यावर होलिका दगावली आणि प्रल्हाद वाचला. आणि तेव्हापासून होलिका दहन हे भगवान भक्त प्रल्हाद यांच्या स्मरणार्थ केले जाऊ लागले.
महत्वाच्या बातम्या :
- Holi 2022 : होळी रे होळी! होळीत केमिकलयुक्त रंग टाळा, घरच्या घरी फुलांपासून तयार रंग करा
- Holi 2022 : रंगाच्या भीतीने होळी खेळणं टाळताय? चेहरा, केस आणि अंगावरील होळीचा रंग कसा काढायचा? वापरा 'या' टिप्स
- Holi 2022 : रंगपंचमीच्या एक दिवस आधी का केले जाते होलिका दहन? जाणून घ्या यामागची कथा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha