Holi 2022 : रंगाच्या भीतीने होळी खेळणं टाळताय? चेहरा, केस आणि अंगावरील होळीचा रंग कसा काढायचा? वापरा 'या' टिप्स
Holi 2022 : केसगळतीमुळे होळीच्या दिवशी रंग खेळण्याची भीती वाटते का, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे तुमचे केस, चेहरा आणि त्वचा रंग होळीच्या रंगामुळे खराब होण्यापासून वाचू शकते.
Holi 2022 : होळीचा उत्साह आठवडाभर आधीच लोकांमध्ये पाहायला मिळतो. होळीचा लहान मुले आणि मोठ्यांमध्ये उत्साह असतो. धुलिवंदनामध्ये रंग खेळण्यात, उधळण्यातही मजा येते. अशा परिस्थितीत काही लोक होळीच्या रंगाचा केस आणि त्वचेवरील परिणामाच्या भीतीपोटी होळी खेळणे टाळतात. मात्र होळी काळजीपूर्वक खेळावी. आवश्यक ती खबरदारी घेतल्यास तुमचे केस आणि त्वचेवरील रंग सहज निघेल. तुम्ही काही टिप्सचा अवलंब करून रंग सहज काढू शकता. होळीच्या गडद रंगापासून सहज सुटका करण्यासाठी आम्ही तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहोत.
होळीच्या दिवशी केसांचे रंगांपासून संरक्षण कसे कराल?
होळीचा रंग केसांमध्ये अशा प्रकारे शोषले जातात की ते सहजासहज निघत नाही. अशा परिस्थितीत केस सुरक्षित ठेवण्याचा उपाय म्हणजे डोक्यावर खोबरेल किंवा मोहरीचे तेल चांगले लावणे. जर तुम्ही तुमच्या केसांना चांगल्या प्रमाणात तेल लावले तर ते लेप म्हणून काम करते आणि केसांचे होळीच्या रंगात असलेल्या रसायने आणि इतर घटकांपासून संरक्षण करते.
चेहऱ्यावरील रंग उतरवण्याचा उपाय
चेहऱ्यावरील होळीचा रंग बरेच दिवस जात नाही. अशा परिस्थितीत जर तुमच्या चेहराही होळीच्या रंगामुळे खराब झाला असेल तर या रंगापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय आहे. दुधात बदाम, संत्र्याच्या सालीची पावडर आणि मसूर डाळीची पावडर मिसळा. याचा लेप संपूर्ण चेहऱ्यावर चांगला लावा आणि कोरडे होताच चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा तर स्वच्छ होईलच पण चमकही वाढेल.
हात आणि त्वचेचा रंग कसा घालवावा
हातावरील आणि शरीराच्या इतर भागावर होळीचा रंग जास्त असेल तर यासाठी बेसनाचा वापर करा. बेसनामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यात थोडे दूध घाला. आता याला फेसपॅक प्रमाणे चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर आणि जिथे रंग असेल तिथे लावा. लावल्यानंतर सुमारे 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे होळीचा रंग निघेल आणि तुमच्या चेहऱ्यावर लगेच चमक येईल.
संबंधित बातम्या :
- Holi 2022 : रंगपंचमीच्या एक दिवस आधी का केले जाते होलिका दहन? जाणून घ्या यामागची कथा...
- No Smoking Day 2022 : धूम्रपान दिनाचा इतिहास आणि महत्त्व नेमकं काय? जाणून घ्या...
- Important Days in March 2022 : मार्च महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha