(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Healthy New Year : नवीन वर्षात राहा हेल्दी आणि फिट; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Healthy New Year : नवीन वर्षात आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे, पैशांची बचत करणे, कुटुंबाला वेळ देणे, कामाचा ताण न घेणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.
Healthy New Year : नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. नवीन संकल्प. अनेकांनी नवीन वर्षात (Happy New Year 2024) कोणता संकल्प करायचा? कोणती शिस्त लावायची? हे कदाचित ठरवलं असेल. यामध्ये नवीन वर्षात आरोग्यावर (Health) लक्ष केंद्रित करणे, पैशांची बचत करणे, कुटुंबाला वेळ देणे, कामाचा ताण न घेणे अशा अनेक गोष्टींचा विचार केला असेल. पण, हा संकल्प काही मोजकेच लोक पूर्ण करू शकतात. असं का घडत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याचं सोपं उत्तर म्हणजे, अनेकदा आपण चुकीचे संकल्प ठरवतो.
यासाठीच आज आम्ही तुम्हाला फिट राहण्यासाठी अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही 2024 मध्ये स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचे तुमचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता.
सकाळी लवकर उठण्याची सवय लावा
हिवाळ्यात सकाळी उठणे हे खरंतर फार कठीण काम आहे, पण, जर तुम्ही एखाद्या दिवशी लवकर उठलात तर त्याचे फायदे नेमके कोणते ते लक्षात घ्या. तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळेल. कॉलेजला, ऑफिसला जाताना नीट नाश्ता करता येईल. वेळेचं नियोजन करता येईल. तसेच शारिरीक ताण येणार नाही यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.
भरपूर पाणी प्या
निरोगी राहण्यासाठी अन्नाइतकंच पाण्याचं सेवनही गरजेचं आहे. यासाठी दिवसातून किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या. पण, हिवाळ्यात जास्त पाण्याचं सेवन होत नाही. अशा वेळी तुम्ही ज्यूस, सूप, दूध किंवा नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. पण, सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा.
स्वत:साठी 30 मिनिटे काढा
कामाच्या गडबडीत आपण इतके व्यस्त असतो की आपण स्वत:साठी वेळच काढत नाही. त्यामुळे नवीन वर्षात स्वत:साठी किमान 30 मिनिटं काढण्याचा संकल्प करा. या वेळेत तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टिव्हीपासून दूर राहा.
जिन्याचा वापर करा
घर किंवा ऑफिसमध्ये वर-खाली करण्यासाठी लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा. असे केल्याने तुम्ही तुमचे पाय तसेच हृदय निरोगी ठेवू शकता.
आहाराकडे लक्ष द्या
जर तुम्ही नवीन वर्षात फिटनेसचा विचार केला असेल तर त्यासाठी योग्य आहाराकडेही लक्ष द्या. यासाठी आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. तसेच, जंक फूड आणि प्रीढर्वेटिव्ह्सचं प्रमाण कमी करा. यामुळे तुमची अनेक आजारांपासून सुटका होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Happy New Year 2024 : नवीन वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा घालवणार? 'हे' 4 उपाय करा