Health Care Tips : हिवाळ्यात सुस्तपणा घालवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा
Health Care Tips : हिवाळ्यात आळस आणि सुस्तपणा घालवण्यासाठी आहारात 'या' आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.
Healthy Foods For Winters : हिवाळ्यात (Winter) संसर्गजन्य रोगांचा रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यासोबतच थंडीमुळे सुस्तीही येऊ लागते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हांला हिवाळ्यात वापरल्या जाणार्या काही सुपर फूड्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा समावेश करुन तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. चला तर मग याविषयी जाणून घेऊया...
रताळे - हिवाळ्यात रताळे खूप फायदेशीर असतात. त्यात उच्च कॅलरीज असतात. हे फायबर, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. यासोबतच रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यात उच्च प्रकारचे तंतू (फायबर) असतात त्याने बद्धकोष्ठ व कोलोन कँसरला प्रतिबंध होतो. त्यातील द्रव्यांनी व्हिटॅमिन ए उत्पादित होते ते शरीरासाठी चांगले असते. ज्यांना श्वासासंबंधी त्रास आहे त्यांना हे फायदेशीर असते. विशेषतः जे धुम्रपान करतात त्यांनी रताळे खायलाच हवे. त्यात व्हिटॅमिन डी असते जे दात हृदय हाडे व ज्यांना थॉयराईडची समस्या असेल यांच्यासाठी चांगले असते.
खजूर - खजूर हे गरम असतात त्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यास मदत होते. यामध्ये कमी फॅट आढळते जे वजन कमी करण्यास मदत करते. खजुरातील आयर्न घटक पचनासंबंधीचे आजार दूर करण्यास मदत करतात. थकवा जाणवणे, रक्त कमी असणार्यांच्या आहारात नियमित खजुराचा समावेश केल्याने फायदा होऊ शकतो. हृदयविकार असणार्यांसाठी खजूराचे सेवन फायदेशीर ठरते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी खजूर फायदेशीर आहे.
अक्रोड - हिवाळ्यात अक्रोड हे पोषणाचा खूप चांगला स्त्रोत मानला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगले कोलेस्ट्रॉल असते जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. अक्रोड वजन कमी करण्यासाठी मदतनीस सिद्ध होते. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन फॅट्स कॅलरीज असतात. अक्रोड तुमची भूक नियंत्रित करते. अक्रोड हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे. यामध्ये अल्फा लीनोलेनिक अॅसिड असते. जे ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे एक रूप आहे. हे रक्ताच्या नसांमध्ये फॅट जमा होणे थांबवते व हृदयाची प्रणाली सुरळीत करते.
अंडी - हिवाळ्यात अंडी सेवन खूप फायदेशीर मानले जाते. हा प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे. तुमच्या शरीराला दिवसभर उर्जेने भरलेले ठेवण्यासाठी मदत करते. अंडी ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या अनेक पोषकतत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे. शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब 12, ब 5 आणि ब 2 ही जीवनसत्त्वे असतात. याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा 3 आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- जीन्सवर ही छोटी बटणं का असतात? माहितीय का...
- BEST Super Saver Plan : बेस्टचे सुपर सेव्हर प्लान; एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन शक्य
- ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद, 88 हजार बाधित आढळले, ओमायक्रॉनचा धोका!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )