(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women's Health Week : कॅल्शिअमचे सेवन वाढविण्यापासून ते कॅफेन कमी करण्यापर्यंत, महिलांसाठी 'या' सोप्या टिप्स
Women's Health Week : राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह महिलांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी साजरा केला जातो.
Women's Health Week : महिला आणि मुलींना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह दरवर्षी मातृदिनाच्या दिवशी सुरु होतो. या वर्षी हा 8 मे ते 15 मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह महिलांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. यावर्षी 21 वा राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह साजरा करणार आहोत.
मजबूत हाडांसाठी कॅल्शियम
मजबूत हाडे, हृदयाची लय नियंत्रित करण्यासाठी तुमच्यामध्ये योग्य कॅल्शियम असणे गरजेचे आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑटिओपोरोसिस होऊ शकतो. आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना याचा धोका जास्त असतो.
भरपूर पाणी प्या
दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायल्याने शरीर केवळ डिटॉक्सिफिक होत नाही तर तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा राखण्यास मदत होते. हायड्रेटेड राहिल्याने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने राहून हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आणि इतर आजार टाळता येतील.
व्हिटॅमिन बी सह सक्रिय राहा
व्हिटॅमिन बी एकंदर आरोग्यासाठी आवश्यक आहे. कारण त्यात फॉलिक अॅसिड किंवा फॉलेट असते. बाळंतपणाच्या वयातील प्रत्येक स्त्री साठी फॉलेटहे एक आवश्यक पोषक तत्व आहे.
कॅफिन कमी करा
जास्त प्रमाणात कॅफिन हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे तुमचे निर्जलीकरण होते. आणि कॅल्शियम बाहेर पडून तुमच्या हाडांवर परिणाम होतो. यामुळे दिवसातून दोन कप कॉफी प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : जेवल्यानंतर लगेच करु नका 'ही' चूक, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )