Women Health: महिलांनो... Thyroid चा त्रास आहे? गर्भधारणाही होत नाही? अनेक समस्या येतायत? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या...
Women Health: महिलांनो..जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे, आणि गरोदरपणात समस्या येत असतील, तर याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, आरोग्य तज्ज्ञ सांगतात...

Women Health: आपण पाहतो, अनेकदा महिला बाळासाठी प्रयत्न करतात, पण त्यांना गरोदर राहण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येमागे नेमकं काय कारण आहे, हे त्यांना कळत नसते. तर महिलांनो आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला माहितीय का? ज्या महिलांना थायरॉईडचा त्रास असेल, अशा महिलांना गर्भधारणेमध्ये काही अडचणी येऊ शकतात, नेमकं काय कारण आहे? तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..
थायरॉईड हा स्त्रियांमध्ये सामान्य आजार
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, थायरॉईड हा स्त्रियांमध्ये सामान्य आजार आहे. या जीवनशैलीच्या आजारामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो, त्यामुळे त्यांना गर्भधारणा होण्यास त्रास होतो. महिलांमध्ये गर्भधारणेच्या समस्यांमागील सर्वात मोठे कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन. हायपोथायरॉडीझम हा स्त्रियांमध्ये थायरॉईडचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्यामुळे त्यांचे वजन वाढते. हायपोथायरॉईडीझममध्ये महिलांना ओव्हुलेशनमध्येही समस्या येतात. कारण थायरॉईड असताना हार्मोन्समध्ये झपाट्याने चढ-उतार होतात, ज्यामुळे प्रजननक्षमतेमध्येही समस्या निर्माण होतात. जाणून घेऊया यावर तज्ज्ञ काय म्हणतात?
जर एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होता येत नसेल, तर... तज्ज्ञ काय म्हणतात?
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ अर्चना जुनेजा यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की हायपोथायरॉईडीझम, ज्याला अंडरएक्टिव्ह थायरॉईड देखील म्हणतात, त्यामुळे वजन वाढणे, केस गळणे, थकवा, कोरडी त्वचा आणि अनियमित मासिक पाळी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या थायरॉईडमुळे महिलांमध्ये वंध्यत्व ही देखील एक सामान्य समस्या आहे. म्हणूनच त्या सांगतात, जर एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होता येत नसेल, तर तिने एकदा तिची थायरॉईड चाचणी करून घेतली पाहिजे.
हायपरथायरॉईडीझम गंभीर आजार
हायपरथायरॉईडीझम, जो थायरॉईडचाच दुसरा प्रकार आहे, जो स्त्रियांमध्ये प्रजनन समस्या निर्माण करतो. यामध्ये, डॉक्टर म्हणतात, जर एखाद्या महिलेने या थायरॉईडसाठी औषध घेतले तर तिने गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण तिच्या औषधाच्या डोसचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच, डॉक्टर म्हणतात की, हायपरथायरॉईडीझमने ग्रस्त असलेल्या महिलांनी त्यांच्या गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत एंडोक्राइनोलॉजिस्टकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
सावधगिरी बाळगणे आवश्यक
डॉक्टर अर्चना सांगतात की थायरॉईडचा त्रास असलेल्या महिला गर्भधारणा करू शकतात, परंतु त्यांनी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्वप्रथम त्यांना त्यांच्या थायरॉईडवर नियंत्रण ठेवावे लागेल. सर्वोत्तम सूचना म्हणजे तुम्ही तुमची थायरॉईड तपासणी वेळोवेळी करून घ्या आणि योग्य जीवनशैलीचे पालन करा.
हेही वाचा>>>
Women Health: मासिक पाळीच्या किती दिवसांनंतर गर्भधारणा शक्य असते? योग्य वेळ अनेकांना माहीत नाही, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
