Weight Loss : थायरॉइडमुळे लठ्ठपणा आलाय? अशाप्रकारे वजन करा नियंत्रित
Thyroid Problem : थायरॉईड वाढल्याने लोकांचे वजन वाढते. अशावेळी वाढलेलं वजन नियंत्रित करणं खूप कठीण होतं. जाणून घ्या तुम्हांला तुमचं वजन कसं नियंत्रित करता येईल.
Weight Gain In Thyroid : सध्या अनेकांना थायरॉईड वाढण्याच्या समस्येला सामारं जावं लागत आहे. विशेषत: महिलांमध्ये थायरॉईड वाढण्याची समस्या अधिक दिसून येते. थायरॉईड हे दोन प्रकारचे असते, एकामध्ये बाधित व्यक्तीचं वजन वाढतं तर दुसऱ्या प्रकारात वजन कमी होऊ लागतं. बहुतेक लोक थायरॉईडमुळे वाढत्या लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत वाढलेलं वजन कमी करणं खूप कठीण होतं. थायरॉईडमुळे वाढलेल्या वजनामुळे तुम्हीही त्रस्त असाल तर या गोष्टींची काळजी घेतल्यासं तुमचं वजन सहज कमी होईल.
थायरॉईडची समस्या तुमच्या जीवनशैलीशी संबंधित आहे. जर तुम्ही जास्त फास्ट फूड खातं असाल किंवा खाण्यापिण्याबाबत बेफिकीर असाल तर तुमचं वजन झपाट्यानं वाढतं. चुकीच्या जीवनशैलीमुळे थायरॉईडचा त्रास वाढतो आणि थायरॉईड वाढला की लठ्ठपणाही वाढू लागतो.
थायरॉईडमध्ये वजन कसं कमी करावं
लसूण : थायरॉईडमध्ये वजन वाढले असेल तर ते कमी करण्यासाठी लसूण खूप फायदेशीर मानलं जातं. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. याचा शरीराला फायदा होतो. लसणामुळे शरीरातील अनेक विकार दूर होतात. लसूण वजन कमी करण्यासही मदत करतो. यासाठी रिकाम्या पोटी लसणाच्या कळ्या खाल्ल्याने थायरॉईडमुळे वाढलेलं वजन कमी करण्यास मदत होईल.
ग्रीन टी : थायरॉईडमुळे तुमचंही वजन वाढलं असेल तर तुम्ही ग्रीन टी जरूर प्या. ग्रीन टी थायरॉईडच्या रुग्णांना वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही रोज ग्रीन टी प्यायलाच पाहिजे. थायरॉईडच्या रुग्णांनी दिवसातून किमान दोनदा ग्रीन टी प्यावा. त्यामुळे वजन कमी करणे सोपे जाईल.
योगासने करा : थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी योग हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. थायरॉईडमधील वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही सर्वांगासन, हलासन, सिंहासन, हुम्यासन, मत्स्यासन अशी योगासने करू शकता. यामुळे तुमचं थायरॉईडमुळे वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Green Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
- Digestion : पचनशक्ती वाढवण्याचे आयुर्वेदिक उपाय, पोट राहील साफ
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )