Travel Tips: विमानातून प्रवास करताय? मग 'हे' चार पदार्थ आजिबात खाऊ नका, अन्यथा महागात पडेल
Travel Tips: काही लोक प्रवासाच्या आनंदासाठी विमानातून प्रवास करतात, तर काही लोकांना नेहमी विमानातून प्रवास करावा लागतोय. त्यांच्यासाठी या सूचना महत्त्वाच्या आहेत.

मुंबई: विमानाचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने अनेकांकडून त्याला प्राधान्य दिलं जातंय. विमानाचा प्रवास आरामदायी आणि आनंदाने भरलेला असतो. पण प्रवासापूर्वी जेवणाबाबत थोडी जरी चूक केली तर संपूर्ण प्रवासाच्या आनंदावर विरजण पडू शकतं. त्यामुळे ज्या वेळी कधी तुम्ही विमान प्रवासाची निवड कराल तेव्हा प्रवासापूर्वी काही पदार्थ खाणे टाळा.
अनेक वेळा घाईत आणि विमानातून प्रवास करण्याच्या उत्साहात आपण रिकाम्या पोटी निघून जातो. अशा स्थितीत विमानामध्ये तुमची तब्येतही बिघडू शकते. तुम्ही जास्त खाल्ल्यास देखील अशीच समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत काय खाल्ल्यानंतर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे माहिती असणं आवश्यक आहे.
विमानाचा प्रवास करण्यापूर्वी हे पदार्थ खाणे टाळा
सफरचंद (Apple)
जर तुम्हाला विमानाने कुठेतरी जायचे असेल तर चुकूनही सफरचंद खाल्ल्यानंतर प्रवासाला जाऊ नका. सफरचंदमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्याला आरोग्याचा मित्र म्हटलं जातं. ते पचायला बराच वेळ लागतो आणि त्यामुळे गॅस किंवा अॅसिडिटी होऊ शकते. साखरेचे प्रमाण जास्त असल्याने सफरचंद खाल्ल्यानंतर प्रवासाला जाऊ नये. फ्लाईटवर जाण्यापूर्वी तुम्ही संत्री किंवा पपई खाऊ शकता.
ब्रोकोली (Broccoli)
तसं ब्रोकोली हा आरोग्याचा खजिना आहे. हे खाल्ल्याने अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात, पण जर तुम्ही विमानाने कुठेतरी जात असाल तर ब्रोकोलीकडे दुर्लक्ष करणंच हिताचे ठरेल. वास्तविक कच्ची कोशिंबीर खाल्ल्याने अपचन आणि अस्वस्थतेची समस्या उद्भवू शकते आणि प्रवासावर विरजण पडू शकतं.
तळलेले अन्न
विमान प्रवास करण्यापूर्वी तळलेले अन्न खाऊ नये. विमानतळावर तळलेले पदार्थ पाहून काहींना मोह होतो. अशा परिस्थितीत ते खाण्यापासून स्वतःला थांबवणे हेच शहाणपणाचं आहे. विमान प्रवासापूर्वी तळलेले पदार्थ खाणं हे खूप हानिकारक ठरु शकतं. तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर सॅच्युरेटेड फॅट असते, त्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.
मसालेदार अन्न
विमानाने कुठेतरी प्रवास करताना मसालेदार पदार्थ आणि तेलकट पदार्थ खाणं टाळावं. पराठा, बिर्याणी यांसारख्या पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज आढळतात, त्यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. यामुळे प्रवासाचा अनुभव खराब होऊ शकतो.
त्यामुळे विमानातून प्रवास करण्यापूर्वी काय खायचं आणि काय नाही याचं नियोजन केल्यास तुमचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.
ही बातमी वाचा :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
