आरोग्यासाठी फायदेशीर काढ्याच्या अतिसेवनाने उद्भवतात 'या' समस्या; दिवसातून इतक्या वेळा सेवन फायदेशीर
कोरोनावर काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्रास काढ्याचं सेवन केलं जातं.
मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. अनेकांनी आपल्या दैनंदिन जीवनात काढ्याचा समावेश केला आहे. असं सांगण्यात येत की, काढा फक्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करत नाही. तर आरोग्याच्या इतरही समस्या दूर करण्यासाठी काढा फायदेशीर ठरतो. पंरतु, ते म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट... तसचं काहीसं काढ्याच्या बाबतमीत झाल्याचं दिसून येत आहे. काढ्याच्याही अतिसेवनानेही अनेक साइड इफेक्टचा सामना करावा लागतो. अशातच दिवसातून किती वेळा आणि किती प्रमाणात काढा पिणं फायदेशीर ठरतं. हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे.
एका दिवसात काढ्याचं प्रमाण किती असावं?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काढ्याचं प्रमाण आयुर्वेदिक शरीरानुसार ठरते. आयुर्वेदात शरीराचे तीन प्रकार सांगण्यात आले आहे. वात, पित्त आणि कफ. त्यानुसार, आपलं शरीरा या तीनपैकी कोणत्यातरी एका प्रवृत्तीचं असतं. याचाच अभ्यास करून शरीरातील दोष, मानसिक अवस्था आणि स्वभाव ओळखण्यास मदत होते.
वात - जर तुमचं शरीर या प्रकारात येत असेल तर काढ्याचं सेवन दिवसातून दोन वेळा करणं फायदेशीर ठरतं. वात प्रकारात येणारे लोकांनी आपल्या काढ्यात थोड्या तुपाचाही समावेश करावा. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा दूर करण्यास फायदेशीर ठरतं.
पित्त - पित्त शरीर असणाऱ्या लोकांनी काढा दिवसातून एकदाच घ्यावा. त्यापेक्षा जास्त वेळा घेऊ नये. याव्यतिरिक्त त्यांनी अनोशापोटी काढ्याचं सेवन करू नये. पित्त शरीर असणाऱ्या लोकांसाठी काढा पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे, संध्याकाळ.
कफ - दिवसातून 2 ते 3 वेळा कफ शरीर असणाऱ्या व्यक्ती काढ्याचं सेवन करू शकतात. अशा लोकांना व्हायरल आजार होण्याची भिती जास्त असते. त्यामुळे काढा त्यांच्या अमृत असतं, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काढा फायदेशीर; असा करा तयार
पाहा व्हिडीओ : आयुर्वेदिक काढ्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावं?, डॉ शिवरत्न शेटे यांचा सल्ला
काढ्याच्या अतिसेवनाने होणारे साइडइफेक्ट्स
काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे काढ्याच्या अतिसेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन शरीराला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही दररोज काढ्याचं सेवन करत असाल आणि तुम्हाला समस्या जाणवू लागल्या तर समजून जा की, तुम्ही काढ्याचं अतिसेवन करत आहात. जर तुम्हाला नाकातून रक्त येणं, लघवीला त्रास होणं, तोंड येणं (माऊथ अल्सर), पित्त होणं आणि पोटात गॅस होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतं.
काढ्याचं प्रमाण किती असावं?
काढ्याचं सेवन करणाऱ्या लोकांनी काढ्याचं प्रमाणंही मर्यादीत ठेवणं गरजेचं असतं. 50 मिलीलीटर पेक्षा जास्त काढ्याचं सेवन करू नये. 100 मिलीलीटर पाण्यात काढ्यात घालणारे पदार्थ घालून उकळण्यास ठेवा. ज्यावेळी हे पाणी उकळून 50 मिलीलीटर होईल. त्यावेळी त्याचं सेवन करा.
(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
- व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक; जाणून घ्या मुख्य स्त्रोत
- लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शन
- कोरोनामुक्त झाल्यानंतरही महिलेला पुन्हा कोरोना, भारतात कोरोना रीइन्फेक्शनचं पहिलं प्रकरण
- कोरोनाच्या संकटकाळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन्सचा ओव्हरडोस घेताय? सावध व्हा
- रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा; लागण झाल्यानंतर नऊ दिवसांनी कोरोना बाधितामुळे संसर्ग होत नाही
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )