व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक; जाणून घ्या मुख्य स्त्रोत
कोरोनाने सध्या थैमान घातलं आहे. अशातच वारंवार डॉक्टरांकडून शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सीचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

मुंबई : सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात आपले हातपाय पसरले आहेत. अशातच कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला वारंवार जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांच्या वतीने केला जात आहे. त्यासाठी आहारात व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांसारख्या अनेक घटकांचा समावेश करण्यास डॉक्टरांच्या वतीने सांगितलं जात आहे. अशातच अनेकदा डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञांकडून 'व्हिटॅमिन सी'चा उल्लेख सतत केला जात आहे. पण तुम्ही विचार केला आहे का? आपल्या शरीराला व्हिटॅमिन सीची गरज का असते आणि व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी कोणते मुख्य स्त्रोत कोणते? तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन सी (Vitamin C)ला एस्कॉर्बिक अॅसिड असं म्हटलं जातं. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास शरीराला अनेक आजारांचा आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन सीचा आहारात समावेश करून शरीराच्या समस्या दूर करणं शक्य होतं.
व्हिटॅमिन सी शरीरासाठी का गरजेचं?
व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. हे हाडं, त्वचा आणि रक्त वाहिन्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. याचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्ताची कमतरता, हाडांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. अनेक संशोधनांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, व्हिटॅमिन सी सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतं. त्वचेचा कोरडेपणा कमी करतं. तसेच त्वचा तजेलदार करण्यासाठीही मदत करतं. डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
शरीराला व्हिटॅमिन सी पुरवण्यासाठी काय कराल?
फळं आणि भाज्या व्हिटॅमिन सीचा मुख्य स्त्रोत आहे. संत्री, लिंबू, ब्रॉकली, स्ट्रोबेरी, आवळा, पेरू, किवी यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. ICMRच्या गाइडलाइन्सनुसार, दररोज कमीत कमी मिलीग्राम व्हिटॅमिन सीचं सेवन करणं गरजेचं आहे. दरम्यान, वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या लोकांसाठी हे प्रमाण बदलू शकतं. मानवी शरीरात व्हिटॅमिन सी तयार होत नाही, तसेच साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरंत.
(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
डिप्रेशन जीवघेणं ठरु शकतं, याची लक्षणे कोणती?
Coronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपायCoronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शन
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























