Diabetes News : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मधुमेहींना टेक्नॉलॉजीचं वरदान
Diabetes News : मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तसेच, त्यांच्या व्यायामाची पद्धत, झोपेची वेळ यांसारख्या सवयींचा सुद्धा रूग्णांच्या तब्येतीवर परिणाम होतो.
Diabetes News : मधुमेह (डायबिटीस) ही एक सर्रास आढळून येणारी आरोग्यविषयक समस्या आहे. मधुमेही रूग्णांनी याकडे नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर देखरेखीमध्ये जराही खंड पडला तर उपचारास वेळ होऊ शकतो. आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आज मधुमेही व्यक्तींच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी सातत्याने तपासणा-या नव्या उपचारपद्धती आणि क्रांतीकारी वेअरेबल तंत्रज्ञाने उपलब्ध झाली आहेत. American Diabetes Association (एडीए) च्या मते ग्लुकोजच्या पातळीवर सातत्याने देखरेख ठेवणे हे (continuous glucose monitoring - CGM) इंटेन्सिव्ह इन्सुलीन उपचार घेणा-या व्यक्तींव्यतिरिक्त इतरांसाठीही उपयुक्त ठरू शकते. ADA च्या म्हणण्याप्रमाणे टाइप 1 आणि टाइप 2 प्रकारातील मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किमान 70 टक्के इतक्या टाइम इन रेंज (टीआयआर)चे लक्ष्य समोर ठेवले पाहिजे.
मधुमेहाच्या रूग्णांनी अशी घ्या काळजी
मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तसेच, त्यांच्या व्यायामाची पद्धत, झोपेची वेळ यांसारख्या सवयींचा सुद्धा रूग्णांच्या तब्येतीवर परिणाम होतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या उपचारांची सुरुवात ही बहुतेकदा एका गोळीपासून होते. कालांतराने HbA1c ची नेमकी पातळी जपण्यासाठी तोंडावाटे घ्यावयाच्या डायबेटिक अँटिबायोटिक औषधांची (ओएडी) संख्या वाढू शकते.
या संदर्भात, पुण्यातील चेल्लाराम हॉस्पिटल डायबेटिस केअर अँड मल्टिस्पेश्यालिटीचे एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि सीईओ डॉ. उन्नीकृष्णन एजी म्हणाले, “मधुमेही आणि इन्सुलिन उपचार घेणा-या किंवा विशिष्ट अँटि-डायबेटिस औषधे तोंडावाटे घेणा-या रुग्णांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप खाली घसरण्याचा किंवा खूप जास्त वाढण्याचा धोका असतो. ग्लुकोजची पातळी खूप वाढल्यास सर्वसाधारणपणे काही लक्षणे दिसत नाहीत, मात्र त्यामुळे शरीराची सातत्याने हानी होत राहते, म्हणूनच मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये सातत्याने देखरेख हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.“
काही रुग्णांच्या बाबतीत मात्र, औषधे घेऊनही त्यांच्यात ग्लुकोजची पातळी वाढलेलीच असते. आणि त्यामुळे त्यांना इन्सुलिन इंजेक्शन्सकडे वळणे त्यांना आवश्यक ठरू शकते. मात्र, इन्सुलिनबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण होतात. आणि त्यामुळे इन्सुलिन घेण्यास टाळाटाळ केली जाते. मधुमेही रूग्णांची विशेषत: जेवणानंतरची ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी इन्सुलिन उपचारांचा समावेश केला जातो. इतकेच नव्हे तर पॉलिपील उपचारपद्धती वापरून म्हणजे काही औषधांची एकत्रितपणे मात्रा निश्चित करूनही काही वेळा रुग्णांना आपली अपेक्षित उद्दीष्ट्ये साध्य करता येत नाहीत, म्हणजे ग्लुकोजचे इष्टतम संयोजन शक्य होत नाही.
रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी
अमेरिकन डायबेटिस असोसिएशन (एडीए) ने 2019 मध्ये इंटेन्सिव्ह इन्सुलिनवर असलेल्या टाइप 2 मधुमेहग्रस्त प्रौढ व्यक्तींसाठी केलेल्या एका पाहणीमध्ये एका continuous glucose monitoring systemचा, म्हणजे या पाहणीच्या बाबतीत FreeStyle Libre1 चा किमान तीन महिने वापर केला आणि त्यामुळे HbA1c ची पातळी 8.9 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे आढळून आले.
रक्तातील ग्लुकोजची पातळी सांभाळण्यामध्ये टाइम इन रेंज (टीआयआर)ची भूमिका
मधुमेहावर नियंत्रण मिळविण्याच्या कामी, पॉलिपील उपचारांवर असलेल्या रुग्णांच्या ओएडींचा इष्टतम वापर व्हावा यासाठी तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल रुग्णांसाठीचे महत्त्वाचे साधन म्हणून टीआयआर महत्त्वाची भूमिका बजावते. इतकेच नव्हे तर ही पद्धत ग्लायकेमिक कंट्रोलचे प्रमाण अचूकपणे मोजते आणि चालू वेळेत उपचारांच्या हस्तक्षेपासाठी मार्गदर्शन करू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : अंगावर खाज येत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
- World Food Safety Day 2022 : जागतिक अन्न सुरक्षा दिन का साजरा केला जातो? खाण्याच्या 'या' चांगल्या सवयी लावा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )