Health Tips : उन्हाळ्यात फ्रीजमधलं नाही तर माठातलं पाणी प्या; जाणून घ्या फायदे
उन्हाळ्यात माठातील (Summer) स्वच्छ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहे. जाणून घेऊयात माठातील पाणी पिण्याचे फायदे...
Health Tips : उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. उन्हाळ्यात घाम जास्त येतो. तसेच उन्हाळ्यात तहान देखील जास्त लागते. अनेक लोक फ्रीजमधील पाणी पितात. पण बरेच लोक मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठामधील पाणी पितात. उन्हाळ्यात माठातील स्वच्छ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहे. जाणून घेऊयात माठातील पाणी पिण्याचे फायदे...
अनेक लोक पाणी थंड करण्यासाठी फ्रीजचा वापर करतात. फ्रीजमधील पाणी खूप थंड होते. जास्त थंड पाणी प्यायल्याने घशासंबंधित समस्या निर्माण होतात. परंतु माठामधील पाणी प्यायल्यानं घशाच्या संबंधित समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत.
पाणी पिताना पाण्याच्या पीएच पातळीकडे विशेष लक्ष द्यावे. पाण्याची पीएच पातळी जास्त असेल तर शरीराच्या आतील अवयवांना खूप नुकसान होऊ शकते. माठात ठेवलेल्या पाण्याची पीएच पातळी संतुलित राहते. माठामुळे पाण्यातील अम्लीय घटक संतुलित राहतात. माठातील पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळीही संतुलित राहते.
उन्हाळ्यात अनेक लोकांना सनस्ट्रोक होतो. अनेकांना उष्माघाताचा सामना करावा लागको. ज्या लोकांना उन्हाळ्यात सनस्ट्रोक होतो त्यांनी माठाती पाणी प्यावे. माठातील पाण्यात पोषक तत्व असतात. हे पाणी प्यायल्यानं शरीर तंदुरुस्त राहते.
माठातील पाणी प्यायल्यानं शरीरातील मेटाबॉलिज्म बुस्ट होते. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बिस्फेनॉलसारखे विषारी रसायन असते. माठाकील पाण्यामध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी संतुलित असते. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म बुस्ट होते.
माठातील पाणी पिताना ही घ्या काळजी
असे बरेच लोक आहेत जे नियमितपणे माठातील पाणी पीत असतात. माठातील पाणी पिताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बर्याच वेळा माठाच्या आतल्या बाजूला बुरशी येते. बुरशी असलेले पाणी प्यायल्यानं शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात जर माठातील पाणी प्यायची सवय असेल तर तो माठ आठवड्यातून दोन वेळा स्वच्छ धुवा. ज्यामुळे माठामध्ये बुरशी लागणार नाही.
उन्हाळ्यात तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी देखील पिऊ शकता. तांब हे पोट, लिव्हर आणि किडनीला डिटॉक्स करते. तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने बॅक्टिरिया मरतात. तसेच तांब पाणी शुद्ध करते. त्यामुळे पोटामध्ये कधीही अल्सर किंवा इफेक्शन होत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Onion Benefits: उन्हाळ्यात कांद्याचे करा सेवन; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )