![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Health Tips : फक्त हातांचे तळवे एकमेकांवर घासूनही मिळतील भन्नाट फायदे; कसं ते वाचा
Palm Rubbing : हाताचे तळवे एकमेकांवर रगडल्याने ॲक्यूप्रेशर पॉइंटवर दवाब वाढतो. यामुळे शरीरातील गरमी तयार होऊन आणि ऊर्जा वाढते.
![Health Tips : फक्त हातांचे तळवे एकमेकांवर घासूनही मिळतील भन्नाट फायदे; कसं ते वाचा rubbing palms of your hands is beneficial you will get these 5 health benefits Health Tips : फक्त हातांचे तळवे एकमेकांवर घासूनही मिळतील भन्नाट फायदे; कसं ते वाचा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/f90c7fdc72bf57c3057ceb8581f2857c1674204752883322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rubbing Palm Benefits : आपण जास्त थंडी (Winter) जाणवायला लागल्यावर हाताचे तळवे (Palm) एकमेंकावर घासतो. याशिवाय तुम्ही पाहिलं असेल की, जर कुणी अचानक चक्कर येऊन पडलं किंवा कुणाचं शरीर थंड पडलं तर, त्याच्या हातांचे किंवा पायांचे तळवे घासतात. पण असं का करतात यामागचं नेमकं कारण काय याचा विचार तुम्ही केला आहे का? हाताचे तळवे एकमेकांवर रगडल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. हाताचे तळवे एकमेकांवर रगडल्याने ॲक्यूप्रेशर पॉइंटवर दवाब वाढतो. यामुळे शरीरात गरमी तयार होऊन आणि ऊर्जा वाढते. याचे इतर अनेक फायदे आहेत, हे कोणते ते वाचा सविस्तर.
आपात्कालीन परिस्थितीमध्ये औषध किंवा उपचारासाठी उशीर असल्यास, हातांचे तळवे घासून परिस्थिती हाताळता येते. पण फक्त आजारी असल्यावरच याचा फायदा होतो असे नाही तर, दररोज हाताचे तळवे घासण्याचे अनेक फायदे आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात ही सवय करुन घेऊ शकता आणि याचा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदा होईल.
हाताचे तळवे घासणे फायदेशीर
आयुर्वेद आणि योग या दोन्ही शास्त्रात हाताचे तळवे घासण्याचे खूप महत्त्व आहे. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी ना जास्त वेळ लागतो ना मेहनत
'हे' आहेत फायदे
डोळ्यांसाठी फायदेशीर
हाताचे तळवे एकमेकांवर चोळल्यानंतर तुम्ही ते डोळ्यांवर ठेवल्यावर तळहाताच्या उबदारपणामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो. तसेच डोळ्यांभोवती रक्ताभिसरण होते. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो. सुरुवातीला मंद गतीने तळहात एकमेकांवर घासणे सुरु करा आणि नंतर हळूहळू वेग वाढवा. तळहातामध्ये ऊर्जा तयार होईल. यानंतर हात चोळणे थांबवा आणि 30 सेकंद हात डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि डोळ्यांचे क्षमता वाढण्यास मदत होते.
रक्ताभिसरण सुधारते
तळहात एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरणही वाढते. हातांचे तळवे घासल्याने अॅक्युप्रेशर पॉईंटवर दाब वाढतो आणि यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला चालना मिळते. यामुळे शरीरात उष्णता तयार होते. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमच्या कामामध्येही चपळता येते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mobile Use : वॉशरुममध्ये फोन वापरताय? आरोग्यासाठी ठरेल घातक; वाचा सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)