(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mobile Use : वॉशरुममध्ये फोन वापरताय? आरोग्यासाठी ठरेल घातक; वाचा सविस्तर
Health Tips : अनेक लोकांना टॉयलेट सीटवरून बसून फोन वापरण्याची सवय असते. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
Moblie Phone Use in Toilet : सध्याच्या आधुनिक जगात मोबाईल फोन (Mobile) ही सुद्धा जणू एक प्राथमिक गरज बनली आहे, असे म्हणावे लागेल. मोबाईल फोनमुळे सर्व जग जवळ आलं आहे. आपण यावर इतके अवलंबून आहोत की, यापासून दूर जाणंही कठीण झालं आहे. कामासाठी असो किंवा मनोरंजनासाठी दिवसेंदिवस मोबाईलचा वापर वाढताना दिसत आहे. आपण कुठेही गेलो तरी, मोबाईलसोबत घेऊन जातो. जर चुकून फोन विसरलो तर, काहीतरी अपूर्ण आहे असं वाटतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल जणू आपला एक अविभाज्य घटक बनला आहे. काही लोक तर जेवणाच्या टेबलापासून अगदी वॉशरुमपर्यंतही मोबाईल फोन घेऊन जातात. अनेक लोकांना टॉयलेट सीटवरुन बसून फोन वापरण्याची सवय असते. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. जर तुम्ही वॉशरुममध्ये फोन वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
वॉशरुममध्ये मोबाईल फोन वापरण्याची सवय घातक
जर तुम्हालाही वॉशरूममध्ये मोबाईल फोन वापरण्याची सवय असेल तर, ही सवय आताच सोडा. हे तुमच्या आरोग्यासाठी फार हानिकारक आहे. अमेरिकेतील सॅनिटायजिंग कंपनी वायोगार्डने याबाबत एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार, 73 टक्के लोक टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरतात. 11 ते 26 वर्ष वयोगटातील 93 टक्के लोक वॉशरुममध्ये मोबाईल फोन वापरतात.
93 टक्के लोक वॉशरूममध्ये मोबाईल फोन वापरतात
या संशोधनात सामील झालेल्या 11 ते 26 वर्ष वयोगटातील अनेकांनी सांगितलं की वॉशरुममध्ये जाऊन मोबाईलवर गेम खेळतात किंवा चॅट करतात. वॉशरुममध्ये जाऊन वर्तमानपत्र वाचणे किंवा पुस्तक वाचण्याचीही काही लोकांना सवय असते. पण ही सवयही खूप धोकादायक ठरु शकते. त्यामुळे लवकरात लवकर ही सवय बदलणे गरजेचं आहे.
वॉशरुममध्ये फोन वापरताना तो कमोडमध्ये पडण्याचा धोका असतो. पण यासोबतच या मोबाईल फोनमुळे तुम्ही आजारी पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. तज्ज्ञांच्या मते, वॉशरुममध्ये मोबाईल फोन वापरण्याची तुमची सवय तुम्हाला फार महागात पडू शकते. वॉशरुममध्ये मोबाईल वापरल्याने तुम्ही आजारी पडण्याचा धोका असतो.
मूळव्याधसारखा आजार होण्याची धोका
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा लोक टॉयलेट करताना कमोडवर बसतात तेव्हा त्यांच्या कंबर आणि नितंब येथील नसांवर दबाव पडतो. ज्या स्थितीत लोक टॉयलेट सीटवर बसून शौच करतात. त्यावेळी तेथील नसांवर दबाव येतो. त्यामुळे मूळव्याधसारखा आजार होण्याची धोका असतो. बराच वेळ बसून मोबाईल फोन स्वाईप किंवा स्क्रोल केल्याने तुम्हाला कंबर दुखीसारख्या आजारांचा ही सामना करावा लागू शकतो.
जे लोक टॉयलेट सीटवर बसून फोन वापरतात त्यांना विष्ठेशी संबंधित आजार देखील होऊ शकतात. याशिवाय टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणे म्हणजे अनेक प्रकारच्या जंतूंना आमंत्रण देण्यासारखे आहे. टॉयलेटमधील जंतू तुमच्या मोबाईल फोनवर चिकटू शकतात आणि ते जंतू तुमच्या शरीरात जाऊन इतर आजारांचा धोका संभवतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )