एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'कितीही पैसे आले तरी आरोग्य विकत घेऊ शकत नाहीत'; 'झिरोदा'च्या सीईओंच्या महत्वाच्या टीप्स 

Nithin Kamath Latest News: नितीन कामत यांनी एक ट्विटर थ्रेड केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जसे आपण 'मोठे' होतो तसे आपलं आरोग्य आपला दर्जा  ठरवतो, पैसा नाही.

Nithin Kamath Latest News:  2020 मध्ये भारतातील झिरोदा ही यूनिकॉर्नचा  दर्जा प्राप्त करणारी एक कंपनी बनली आणि कोकणी परिवारात जन्मलेले नितीन कामत हे नाव जगभरात पोहोचलं.  फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या टॉप 100 यादीत ते आले. याच नितीन कामतांनी आरोग्याविषयी काही महत्वाच्या टीप्स सांगितल्या आहेत. ज्याची सध्या खूप चर्चा सुरु आहे.

नितीन कामत यांनी एक ट्विटर थ्रेड केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जसे आपण 'मोठे' होतो तसे आपलं आरोग्य आपला दर्जा  ठरवतो, पैसा नाही.  मी गेली काही वर्षे आरोग्याविषयी थोडा विचार केला आहे. माझ्यासोबत आणि आमच्या टीमसोबत प्रयोग देखील करत आहे. मी काही स्टार्टअप्सना पाठिंबा देत आहे जे भारतीयांना निरोगी करण्यासाठी मदत करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

नितीन कामत यांनी म्हटलं आहे की, पैशांसंदर्भातील ध्येयांचा पाठलाग करताना हे लक्षात घेणं आवश्यक आहे की,  पैसे चांगले आरोग्य विकत घेऊ शकत नाहीत. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपले आरोग्य आपल्या जीवनाचा दर्जा ठरवते, पैसा नाही.  
 
कामत यांनी म्हटलं आहे की, फक्त दिसणं महत्वाचं नाही तर आपण निरोगी कसे राहू हे महत्वाचे आहे. सेलिब्रिटी  लोकांचा अनेकांवर प्रभाव असतो. मात्र ते झगमगाट आणि केवळ फोटोंद्वारे फक्त दाखवत असतात. ते सुंदर दिसण्यासाठी आरोग्यासोबत प्रयोग करतात, जे चुकीचं आहे. 
 
त्यांनी म्हटलं की, बसून राहणे हे देखील नवीन प्रकारचे धूम्रपान आहे. आपण काम करताना किती हालचाल करतो हे महत्वाचं. सतत बसलेलो असेल दर 45 मिनिटांनी उभे राहून काम करण्यानं माझ्या लाईफस्टाईलवर चांगला परिणाम झाला. त्यांनी सांगितलं की, रात्री 9 वाजता झोपणे आणि सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करणे माझ्यासाठी उपयुक्त ठरले आहे. लवकर झोपल्याने आपल्या आत्म-नियंत्रणासाठी खूप फायदा होतो. तेव्हा द्विधा मनस्थितीची शक्यता कमी होते. सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर आरोग्यदायी काम करण्याची शक्यता वाढते. 
 
ते म्हणातात, मला वाटतं कमी झोपणं आणि जास्त काम करणं हे गौरवास्पद आहे. आयुष्य मॅरेथॉन सारखे आहे; जर तुम्ही जग वेगाने धावत असेल आणि स्वत:ला गती दिली नाही, तर तुम्ही संपू शकता. रोज झोपण्याआधी   1 तास मोबाईल, लॅपटॉप अशी सर्व उपकरणे बाजूला ठेवत आपले छंद जोपासा, आपल्या मुलांबरोबर वेळ घालवा, असा सल्ला देखील नितीन कामत यांनी दिला आहे.  

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget